शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासंदर्भात गडकरींना भेटणार

By admin | Updated: July 30, 2014 00:18 IST

नाशिक-पुणे महामार्ग : निमाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत उद्योजकांचा निर्णय

सातपूर : रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूसंपादन केल्यास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या कामास गती मिळेल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने याबाबत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची पुढच्या आठवड्यात भेट घेण्याचा निर्णय निमात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येणाऱ्या अडचणींचा विचार करण्यासाठी निमात बैठक घेण्यात आली. या बैठकीस नाशिक सिटीझन फोरमचे जितूभाई ठक्कर, क्रेडाईचे अनंत राजेगावकर, महाराष्ट्र चेंबरचे संतोष मंडलेचा, निमाचे माजी अध्यक्ष मनीष कोठारी, अध्यक्ष रवि वर्मा, सरचिटणीस मंगेश पाटणकर, व्हिनस वाणी, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, उत्तम दोंदे, एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता पी. के. पाटील, आशिष नहार आदि उपस्थित होते. रस्त्याच्या चौपदरीकरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना बाजारभावाप्रमाणे दर मिळावा, रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूसंपादन करावे, काही ठिकाणी शासकीय जागेचा वापर करावा, जमिनी देण्यास विरोध नसल्याची भूमिका पुंजाभाऊ सांगळे, प्रकाश वैरागर, अ‍ॅड. शरद गायधनी, ए. टी. पडवळ, गिरीश पालवे, दिलीप गायधनी आदि शेतकऱ्यांनी मांडली. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय या बैेठकीत घेण्यात आला. अपेक्षित चर्चा झाल्यास स्थगिती मागे घेतली जाईल, अशीही भूमिका नाशिक-पुणे महामार्ग कृती समितीने जाहीर केली आहे. (वार्ताहर)