'मी चुकलो काही ठिकाणी कमी पडलो, चुकांत सुधारणा करू'; दादा भुसेंची भर सभेत कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:44 IST2026-01-19T19:36:28+5:302026-01-19T19:44:25+5:30

नाशिक महापालिकेच्या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना मंत्री दादा भुसे यांनी निकाल स्वीकारण्याची भूमिका स्पष्ट केली. नाशिक महापालिकेत शिवसेनेचे २६ नगरसेवक निवडून आले असून, सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे त्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या संदर्भात पक्षाची बैठकही पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

'I made mistakes and fell short in some areas, I will correct my mistakes'; Dada Bhuse's confession in the assembly | 'मी चुकलो काही ठिकाणी कमी पडलो, चुकांत सुधारणा करू'; दादा भुसेंची भर सभेत कबुली

'मी चुकलो काही ठिकाणी कमी पडलो, चुकांत सुधारणा करू'; दादा भुसेंची भर सभेत कबुली

"मी मतदारांचे आभार व्यक्त करतो. अर्थात आणखी आशिर्वादाची अपेक्षा होती. दुर्दैवाने आपले काही उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत.मी समजतो की कदाचित, माझ्या नियोजनात काही कमतरता झाली असेल म्हणून काही ठिकाणी आपल्याला अपयश आले, अशी कबुली दादा भुसे यांनी आज नाशिकमधील बैठकीत दिली.  या निवडणुकीत अनेक उमेदवार उभे राहण्यासाठी ते इच्छुक होते, त्यांची तयारी होती पण, काही उमेदवारांना यावेळी थांबावे लागले, त्या उमेदवारांचे मी आभार मानतो. त्या उमेदवारांनी माघार घेऊन उमेदवारांचे प्रचार केले, असंही भुसे म्हणाले.

नाशिक महापालिकेच्या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना मंत्री दादा भुसे यांनी निकाल स्वीकारण्याची भूमिका स्पष्ट केली. नाशिक महापालिकेत शिवसेनेचे २६ नगरसेवक निवडून आले असून, सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे त्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या संदर्भात पक्षाची बैठकही पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

“निश्चितपणे आम्हाला अधिक आशीर्वाद मिळतील अशी अपेक्षा होती. मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून येतील, अशी खात्री होती. मात्र जनता जनार्दनाने जो निर्णय दिला आहे, तो स्वीकारावा लागतो. अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून कोणावर बोट दाखवणार नाही. मी निकाल स्वीकारणारा कार्यकर्ता आहे. झालेल्या चुका आम्ही नक्कीच सुधारू आणि पूर्ण अभ्यास करूनच पुढील भाष्य करू,” असे दादा भुसे म्हणाले. आकडेवारी सर्वांसमोर असून त्यावरच पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी बाकावर बसण्याबाबत निर्णय एकनाथ शिंदेंचा

महापालिकेत विरोधी बाकावर बसण्याबाबत विचारले असता, दादा भुसे म्हणाले की, “या संदर्भात अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील. त्यांना जे योग्य वाटेल, तेच निर्णय घेतला जाईल.”

मालेगाव सत्ता : हिंदुत्वावर तडजोड नाही

मालेगाव महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आकडेवारी जगजाहीर आहे. “मालेगावच्या दृष्टिकोनातून आणि शिवसेनेच्या भूमिकेतून जो निर्णय योग्य असेल, तो शिंदे साहेब घेतील. मालेगावमध्ये शिवसेना प्रमुख पक्ष असून सुमारे २० नगरसेवक आहेत. वरिष्ठांच्या कानावर सर्व बाबी घालून निर्णय घेतला जाईल. हिंदुत्वाच्या विषयात कोणतीही तडजोड होणार नाही. आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका मांडू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

परिस्थितीनुसार निर्णय

मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत बोलताना दादा भुसे म्हणाले की, “मुंबईत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आणि परिस्थितीनुसार संवाद साधून योग्य तो निर्णय घेतला जाईल.”

ठाकरे गटाच्या शिवसेना नगरसेवकांच्या नॉटरीचेबलबाबत विचारले असता, “याबाबत मला कोणतीही माहिती नाही,” असे दादा भुसे यांनी सांगितले.

जनता जनार्दनाचा कौल शिंदे यांच्या शिवसेनेलाच

शिवसेनेच्या एकूण कामगिरीवर भाष्य करताना दादा भुसे म्हणाले की, “जनता जनार्दनाने तोलामोलाचा कौल दिला असला तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, तिथेही शिंदे यांच्या शिवसेनेवरच शिक्कामोर्तब होईल.

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत आश्वासन

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “एकनाथ शिंदे यांनी योजनेबाबत आश्वस्त केले आहे. पूर्वीचेच निकष लागू राहतील. पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल. मोठ्या प्रमाणावर ई-केवायसी पूर्ण झाली आहे.

स्वीकृत नगरसेवकांबाबत घोडेबाजार होणार नाही

स्वीकृत नगरसेवकांच्या लॉबिंगविषयी बोलताना दादा भुसे म्हणाले, “जिथपर्यंत शिवसेनेचा विषय आहे, तिथे घोडेबाजार होणार नाही. सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी दिली जाते. स्वीकृत नगरसेवकांबाबत अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. अपेक्षा असणे चुकीचे नाही, मात्र संख्या आणि निकष पाहूनच पुढे जाणार आहोत.

Web Title : भुसे ने नाशिक में चुनावी झटकों के बाद गलतियाँ मानीं, सुधार का वादा किया

Web Summary : दादा भुसे ने नाशिक में चुनावी झटकों के बाद चुनाव योजना में कमियों को स्वीकार किया। अपेक्षित सफलता नहीं मिलने के बावजूद, उन्होंने परिणामों को स्वीकार किया और सुधार का आश्वासन दिया। भुसे ने कहा कि एकनाथ शिंदे विपक्ष की भूमिकाओं पर फैसला करेंगे। उन्होंने मालेगाँव में हिंदुत्व पर कोई समझौता नहीं करने पर जोर दिया और कहा कि मुंबई में परिस्थितियों के आधार पर निर्णय लिए जाएंगे।

Web Title : Bhuse Admits Mistakes, Promises Improvements After Election Setbacks in Nashik

Web Summary : Dada Bhuse acknowledged shortcomings in election planning after setbacks in Nashik. Despite not achieving expected success, he accepted the results and assured improvements. Bhuse stated Eknath Shinde will decide on opposition roles. He emphasized no compromise on Hindutva in Malegaon and decisions will be made based on circumstances in Mumbai.