शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

श्यामक्षण जगले मी राधिका...

By admin | Updated: November 14, 2015 22:20 IST

आरती अंकलीकर यांची मैफल रंगली

नाशिक : पहाटेच्या सूर्यकिरणांच्या साथीने व साक्षीने सुरेल स्वरही उमलू लागले... रागदारीतले शास्त्रीय गायन असो की अभंगवाणी, या स्वराविष्कारात रसिक देहभान विसरले अन् भाऊबिजेची पहाट सार्थकी लागल्याची भावना प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर प्रगटली...निमित्त होते आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या वतीने आयोजित प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टीकेकर यांच्या गायन मैफलीचे. गंगापूर रोड येथील प्रमोद महाजन उद्यानात भाऊबिजेच्या पहाटे ही मैफली रंगली. अंकलीकर-टीकेकर यांनी सालग वराळी रागाने गायनाला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’ अभंग सादर करीत वातावरण भक्तिमय केले. द्वितीय सत्रात त्यांनी राग जयजयवंती पेश करीत कानसेनांना तृप्त केले. त्यानंतर ‘मी राधिका’ हे भावगीत सादर केले. ‘अवघा रंग एकचि झाला’ या अभंगाने मैफलीचा समारोप झाला. वैभव खांडोलकर (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), गणेश बापट (पखावज), स्वरूपा बर्वे (तानपुरा) यांनी त्यांना संगीतसाथ दिली. श्याम पाडेकर यांनी निवेदन केले. आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस अकादमीचे सहायक संचालक हरीश बैजल, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, मविप्रचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, विश्वास बॅँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, अभिनेते दीपक करंजीकर, विद्या करंजीकर, सुरेश पाटील, गोपाळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार प्रा. फरांदे व भाजपाचे प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.