शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

नांदगावी जंगलाला लागलेल्या भीषण आगीत शेकडोे वृक्ष खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 8:16 PM

नांदगांव : एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात सुरू असताना, नांदगावी शहरापासून दोन किमी अंतरावर असलेले वनविभागाचे राखीव जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत शेकडो वृक्ष खाक झाले. गुरुवारी रात्री ११वा.च्या सुमारास लागलेल्या आगीच्या ज्वाळा शहरात दिसल्या, तर धुराचा वास वाऱ्याबरोबर शहराच्या वेशीपर्यंत पोहोचला. अज्ञात समाजकंटकांनी जंगलात जाऊन नववर्षाची पार्टी करतांना केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशा समाज कंटकांचा शोध घेण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. दरम्यान, आगीचे वृत्त कळताच शहराच्या विविध भागातून निसर्गप्रेमी नांदगावकर मिळेल त्या वाहनांनी घटनास्थळी धावले.

ठळक मुद्दे १० हेक्टरवरील झाडांचे नुकसान, अज्ञात समाजकंटकांवर कारवाईची मागणी

मालेगाव रस्त्यालगत डोंगराजवळ २० हेक्टर क्षेत्रात आठ वर्षांपूर्वी वनविभागाने लावलेल्या जंगलात आज ३,००० पेक्षा अधिक संख्येने झाडे होती. जंगलात वाळलेले गवत आहे. त्यातून उठलेल्या ज्वाळा अल्पावधीत २५ ते ३० फूट उंचीपर्यंत पोहोचल्या आणि वायूच्या वेगाने ही आग संपूर्ण क्षेत्रावर पसरली.वाऱ्यासोबत धावणाऱ्या आगीत घुसून निसर्गप्रेंमींनी, पोलीस, वनविभागाचे कर्मचारी अधिकारी आदींनी आग विझविण्यासाठी मदत केली. मिनिटागणिक पसरणाऱ्या आगीला थांबविण्यासाठी शेकडो हात सरसावले. हातात हिरव्या पाल्याच्या फांद्या घेऊन त्याचे फटके मारून आगीशी सामना केला. १० हेक्टर जंगल जळून खाक झाले.नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन बंदचजंगलाच्या दक्षिण दिशेला, तार कंपाउडच्या कडेला बसून मद्य पिऊन झिंगाट झालेल्या बेजबाबदार व्यक्तींकडे संशयाची सुई वळली असून, वनविभागाने या घटनेचा शोध लावण्यासाठी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी करण्यात येत आहे. निंब, सौंदड, बोर, खैर, हिवर, बाभूळ, शिसम, चमेली, हरणदोडी, फापडा, अंजन, सीताफळ, रामफळ आदींसह विविध जातींची वृक्षसंपदा आगीत जळाली. लाखो रुपये खर्चून घेतलेली नांदगांव नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी गत सात वर्षांपासून चालकाविना बंद आहे. याचे स्मरण सर्वांना झाले. नांदगांव वनविभाग, पोलीस दल, गृहरक्षक, जनसेवा मंडळ, श्रीरामनगर ग्रामस्थ, पोलीस निरीक्षक अनिल काकडे, चंद्रशेखर कवडे, नानू कवडे, अमोल कोठावदे, दीक्षित बंधू, अमोल निकम मित्रमंडळ, अमोल खैरनार मित्रमंडळ, राऊत बंधू, सोनज बंधू, जनार्दननगर, श्रीरामनगर, कोकणवाडा, खैरनार वस्ती, बँक काँलनी, शिवस्फूर्ती भागातील नागरिकांनी मदत केली. वनअधिकारी डी.डी. बोरसे, सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग