कोणार्कनगरला दीड लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 17:49 IST2018-09-09T17:48:48+5:302018-09-09T17:49:51+5:30
नाशिक : दरवाजाच्या लॅचचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून घरातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़८) सकाळच्या सुमारास आडगाव शिवारात घडली़

कोणार्कनगरला दीड लाखांची घरफोडी
नाशिक : दरवाजाच्या लॅचचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून घरातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़८) सकाळच्या सुमारास आडगाव शिवारात घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू अहेर यांचे कोणार्कनगरमधील सद्गुरू कृपा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे़ शनिवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी अहेर यांच्या घराच्या लाकडी दरवाजाचे लॅचचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून घरातील लोखंडी कपाटाच्या तिजोरीत ठेवलेली ८० हजार रुपयांची रोकड, ५० हजार रुपयांचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस व १५ हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे असा १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला़
याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.