वडाळकर वस्तीजवळील शेतात सापडला मानवी सांगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 23:15 IST2021-10-13T23:15:14+5:302021-10-13T23:15:50+5:30
नांदगाव : शहरापासून दोन कि.मी. अंतरावर वडाळकर वस्तीजवळ शेतात कवटी व पायाची हाडे शिल्लक असलेला मानवी देह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि.१३) दुपारी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या मुलांना तो दिसला. शाकंबरी नदीच्या पुरात तो वाहून आला असावा असा तर्क करण्यात येत आहे.

वडाळकर वस्तीजवळील शेतात सापडला मानवी सांगाडा
नांदगाव : शहरापासून दोन कि.मी. अंतरावर वडाळकर वस्तीजवळ शेतात कवटी व पायाची हाडे शिल्लक असलेला मानवी देह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि.१३) दुपारी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या मुलांना तो दिसला. शाकंबरी नदीच्या पुरात तो वाहून आला असावा असा तर्क करण्यात येत आहे.
मृत देहाचा मधला भाग छातीच्या बरगड्या व मणके गायब आहेत. शरीरावर कपडे नाहीत. वैद्यकीय अधिकारी डॉ. शमिना मोमीन यांनी शवविच्छेदन केले. सांगाडा पुरुषाचा की महिलेचा या तपासणीसाठी धुळे येथील शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांनी दिली. दरम्यान या घटनेबद्दल अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.