अर्ज दाखल करण्यासाठी आज होणार गर्दी?
By Admin | Updated: January 30, 2017 00:44 IST2017-01-30T00:44:27+5:302017-01-30T00:44:46+5:30
अर्ज दाखल करण्यासाठी आज होणार गर्दी?

अर्ज दाखल करण्यासाठी आज होणार गर्दी?
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी तीन दिवसांत केवळ तीनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या सोमवारी घोषित होण्याची शक्यता असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस गर्दी होण्याची चिन्हे आहेत. महापालिका निवडणुकीसाठी दि. २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी अमावास्येमुळे एकही अर्ज दाखल झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी केवळ तीनच अर्ज दाखल झाले. रविवारीही उमेदवारांनी निवडणूक कार्यालयांकडे पाठ फिरविली. त्यामुळे सहाही विभागात निवडणूक कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. सोमवारपासून राजकीय पक्षांकडून उमेदवार घोषित होण्यास सुरुवात होईल, त्यानंतर खऱ्या अर्थाने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस गती प्राप्त होणार आहे.(प्रतिनिधी)