शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालये रिकामे तरीही नवीन कोविड सेंटर्सचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 01:27 IST

नाशिक: शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना रूग्णालयात खाटा मिळत नसल्याची तक्रार आहेत. त्यामुळे महापालिका आता संभाजी स्टेडीयम येथेही नवीन कोविड सेंटर उभारणीची तयारी सुरू असली तरी प्रत्यक्षात मात्र, महापालिकेचे अनेक रूग्णालये पडुन आहेत. गंगापूर रूग्णालय, विल्होळी तसेच तपोवन येथील कोविड सेंटर्स कार्यन्वीत नसून त्यामुळे सुमारे दोनशे खाटा उपलब्ध होणे शक्य असातान देखील त्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाही. मुलतानपुरा येथे छोटे रूग्णालय कार्यान्वीत झाले तरी किमान तेथे पंचवीस रूग्णांची सोय होऊ शकते. मात्र, जागा उपलब्ध असताना देखील त्यात व्यवस्था नसल्याने रूग्णांना दारोदार भटकतींची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअजब कारभार: गंगापूर रूग्णालय पूर्णता बंद, विल्होळी, तपोवनच्या खाटा रिक्तच

नाशिक: शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना रूग्णालयात खाटा मिळत नसल्याची तक्रार आहेत. त्यामुळे महापालिका आता संभाजी स्टेडीयम येथेही नवीन कोविड सेंटर उभारणीची तयारी सुरू असली तरी प्रत्यक्षात मात्र, महापालिकेचे अनेक रूग्णालये पडुन आहेत. गंगापूर रूग्णालय, विल्होळी तसेच तपोवन येथील कोविड सेंटर्स कार्यन्वीत नसून त्यामुळे सुमारे दोनशे खाटा उपलब्ध होणे शक्यअसातान देखील त्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाही. मुलतानपुरा येथे छोटे रूग्णालय कार्यान्वीत झाले तरी किमान तेथे पंचवीस रूग्णांची सोय होऊ शकते. मात्र, जागा उपलब्ध असताना देखील त्यात व्यवस्था नसल्याने रूग्णांना दारोदार भटकतींची वेळ आली आहे.कोरोना मुळे महापालिकेने आपली यंत्रणा पुरेशी नसल्याने खासगी रूग्णालये ताब्यात घेतली असली तरी महापालिकेच्या स्वमालकीची रूग्णालये अक्षर: पडून आहे विशेष म्हणजे महापालिकेने सध्या कोरोनासाठी घाईघाईने वेबसाईट आणि अ­ॅप तयार करून त्यात रियल टाईम माहिती देण्याची व्यवस्था केली असली तरी त्यातच या उणिवा स्पष्ट होत आहते. गेल्या मंगळवारी झालेल्या महासभेत वैद्यकिय अधिक्षक डॉ बापुसाहेब नागरगोजे यांनी शहरात ५७ कोविड सेंटर्स तर १३२ व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत, अशी माहिती दिली होती.शहरात ९ कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. त्यांची क्षमता १ हजार ७३५ खाटांची आहे. महापालिकेच्या नवे बिटको रुग्णालय २०० खाटांचे असून त्यात १०० खाटा आॅक्सीजनच्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे गरजेनुसार ४८ खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यात १ हजार ३३४ खाटा आहेत. त्यापैकी ५७७ आॅक्सीजन बेड, २६३ आयसीयू बेड आणि ६९व्हेंटीलेटर्स उपचारासाठी उपलब्ध आहेत. कोरोना रूग्णालयात ६३० खाटा असून ३६५ आॅक्सीजन बेड आहेत तसेच १०९ आयसीयू बेड आणि ६३ व्हेंटीलेटर्स आहेत.डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १५० खाटा, १०० आॅक्सीजन बेड, २० आयसीयू बेड व ९ व्हेंटीलेटर्स आहेत. नाशिक शहरात सरकारी व खासगी रुग्णालय मिळून एकूण ९४२ आॅक्सीजन बेड, ३५८ आयसीयू बेड व १३२ व्हेंटीलेटर्स सुविधा उपलब्ध आहे , असा दावा त्यांनी केला होता. मात्र, दुसरीकडे महापालिकेचे अनेक रूग्णालये आणि कोविड केअर सेंटर्स नावाला असल्याचे देखील आढळत आहे.महापालिकेच्या गंगापूर रूग्णालय ४० खाटांचे रूग्णालय जैसे थे पडून आहे.याठिकाणी डॉक्टर आणि अन्य कर्मचारी आहेत. मात्र, प्रशासन ते कार्याान्वीत करण्यास अनुत्सूक दिसते. तपोवन येथे सुरूवातील तयार करण्यात आलेले कोरंटाईन सेंटरचे नंतर कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले. मात्र येथील चाळीस खाटांचे रूग्णालय देखील बंद आहे. विल्होळी जवळ महापालिकेच्या खत प्रकल्पाजवळील प्रशिक्षण केंद्रात तब्बल शंभर खाटा दर्शविण्यात आले आहेत. वडाळा येथे ६० खाटा आणून ठेवण्यात आल्या आहेत.मात्र तेथे रूगम्हणजे इनअ­ॅक्टिव्ह म्हणजे बंद आहे. केवळ हे रूग्णालय आणि कोविड सेंटर सुरू करण्यात आले तरी १८० रूग्णांची सोय होऊ शकेल. मुलतानपुरा येथे देखील रूग्णालय दोन नगरसेवकांच्या वादात अजुनही रूग्णालय सुरू होऊ शकलेले नाही. म्हणजे महापालिकेने पुर्ण क्षमतेने रूग्णालय सुरू केले तरी किमान दोनशे ते अडीचशे रूग्णांची सोय होऊ शकेल. मात्र अशा अपु-या यंत्रणेमुळेच खासगी रूग्णालयांचा आसरा घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे मनपाची रूग्णालये बंद आणि दुसरीकडे आता सिडकोतील संभाजी स्टेडीयम येथे नव्याने कोविड सेंटर सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. त्यावर खर्च करण्या आधी अगोदरच्या यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येत आहे.मनपाच्या डॅश बोर्डवर गंगापूर रूग्णालय, तपोवन आणि विल्होळी सेंटर इन अ­ॅक्टिव दाखवले जात आहे. वास्तविक अशाप्रकारे विभागनिहाय कोविड सेंटर सुरू केले तर त्या त्या भागात रूग्णांना जवळच सोय होऊ शकते. आज गंगापूर गावातील रूग्णालय बंद असल्याने तेथील रूग्णाला देखील डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात दाखल करण्यास हेल्पलाईनवर सांगितले जाते विलंबाने रूग्ण दाखलहोण्याच्या घोळात एखाद्या रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो.- वर्षा भालेराव, नगरसेविका, सातपूरमनपाच्या हेल्पलाईनवर दुरध्वनी केल्यास वेबसाईट बघण्यास सांगितले जाते. त्यातील महिती आणि प्रत्यक्ष स्थिती जुळत नाही. कोविड अ­ॅप तर जुलै महिन्यातच बंद पडले आहेत, त्यात अपडेट नाही, या कथीत रियल टाईम यंत्रणेत आधी सुधारणा करण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या