नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 21:25 IST2025-10-18T21:23:57+5:302025-10-18T21:25:16+5:30
Nashik Crime: पोलिसांनी तुषार गायकवाड ऊर्फ चिक्या, ओमकार शेलार, सौरभ, कुलदीप या चौघांवर मारहाण व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
Nashik Crime News: सातपूर येथील जगतापवाडीत हाणामारी सोडविण्यास गेलेल्या युवकाच्या डोक्यात फरशी व चॉपरने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. हल्लेखोर इतक्यावरच थांबले नाहीत. एकाने चक्क जखमीच्या युवकाच्या तोंडात बंदूक घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
जखमी युवक स्वतःला वाचविण्यासाठी तेथील घरावर चढून गेला असता संशयितांनी घरावर व तेथील वाहनांवर लाकडी दंडुका, कोयत्याने हल्ला करत दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी (१५ ऑक्टोबर) रात्री ८:३० वाजता घडली.
या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रात्री उशिरा चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रेश शंकर विश्वकर्मा (वय २९) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
हत्या करण्याचा प्रयत्न करणारे आरोपी कोण?
पोलिसांनी तुषार गायकवाड ऊर्फ चिक्या, ओमकार शेलार, सौरभ, कुलदीप या चौघांवर मारहाण व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी मारहाण का केली?
संशयित आरोपी एका व्यक्तीला मारहाण करीत असताना फिर्यादी चंद्रेश तेथे गेला व त्याने मारहाण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. याच राग आल्याने चौघांनी चंद्रेश याला मारहाण सुरू केली.
ओमकार शेलारने चंद्रेशच्या डोक्यावर चॉपरने प्रहार केला; तर तुषार गायकवाडने त्यांच्याकडील बंदूक काढत चंद्रेशच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील तुषार गायकवाड, ओमकार शेलार यांना अटक करण्यात आली आहे.