समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:02 IST2025-06-27T16:52:19+5:302025-06-27T17:02:40+5:30
समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्यावर भीषण अपघात झाला. यामध्ये नाशिकच्या उद्योगपतींचा मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या आलिशान मर्सिडीजचा भीषण अपघात झाला. मर्सिडीज कारने तीनवेळा पलटी मारली आहे, यामध्ये नाशिक येथील उद्योगपती सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पत्नी व दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नाशिककडे ही कार जात होती. समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीने तीन वेळा पलटी मारली आणि सुनील हेकरे हे गाडीतून बाहेर फेकले गेले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, यामुळे जागेवरच मृत्यू झाला.
अपघातानंतर हेकरे यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. मृत सुनील हेकरे यांचे बंधू अनिल हेकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघाताच्या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. "महामार्गावरील बांधकामाची गुणवत्ता निकृष्ट असून, अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला.