नाशिकजवळ बोलेरो अन् दुचाकीचा भीषण अपघात; ५ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 15:46 IST2024-04-05T15:45:34+5:302024-04-05T15:46:50+5:30
चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरुन येणाऱ्या दुचाकीला जाऊन बोलेरो कार धडकली

नाशिकजवळ बोलेरो अन् दुचाकीचा भीषण अपघात; ५ जण ठार
नाशिक/मुंबई - देशात आणि राज्यात महामार्ग व रस्ते बांधणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र, गतीमान प्रवास आणि अतिघाई हेही अपघाताचे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळेच, गेल्या काही वर्षात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता नाशिक -दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावाजवळ बोलेरो गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघाता पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरुन येणाऱ्या दुचाकीला जाऊन बोलेरो कार धडकली. या अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर, दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले मतद व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातातील मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, या अपघातात बोलेरो कारचा चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिकांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता.