Hoorada party thrust into Yeola taluka in cold | थंडीत येवला तालुक्यात हुरडा पार्टीना जोर

थंडीत येवला तालुक्यात हुरडा पार्टीना जोर

ठळक मुद्देज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ते शक्तीवर्धक असतं.

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या वस्तीवर व फार्महाऊसवर सध्या मोठ्या प्रमाणात हुर्डापार्टीचा जोर वाढला आहे.हुर्डा पार्टी सध्या खाजगी फार्म वर मोठ्या प्रमाणावर सुरूअसून, थंडीच्या हुडहुडीत शेकोट्या चा आसरा घेत हुर्डा पार्ट्यांनी जोर धरला आहे. हुर्डा आण िभरीत यासह अन्य खमंग जेवणा वळीचा अस्वाद घेणे लोक पसंत करीत आहे.शाकाहार हाच उत्तम आहार हे ब्रीद सध्या हुर्डा पार्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.
खेडोपाड्यात ज्वारीची भाकरी हेच लोकांचं प्रमुख अन्न असलं तरी आजकाल साखर वाढल्याने ज्वारी अधिक प्रिय वाटू लागली आहे. रब्बी हंगामातलं ज्वारीचं पीक जूनमध्ये लावलं जातं. थंडीच्या दिवसात साधारणपणे जानेवारीच्या सुमारास त्याची कणसं कोवळी आण िरसदार असतात. प्रत्यक्ष शेतात जाऊन, तिथंच कणसं काढून त्याची हुरडा पार्टी करायची मजा काही औरच आहे. कणीस भाजून त्यातले हिरवेगार दाणे काढून ते बोचणार्या थंडीत खाण्यात खूप मजा असते.
हिवाळा चांगला सुरु झाला आहे.खेड्यावर हुरडा पार्टी चालू झाल्या आहेत. त्यातून एक प्रकारे निसर्ग पर्यटन होतं.
आजकाल काही दुकानांत ज्वारीचे कोवळे दाणे अर्थात हुरडा मिळत असला, तरी जी मजा शेतात आहे ती घरात नाही. हुरड्याबरोबर शेंगदाणा, तीळ, खोबरं आण िलसूण अशा चटण्याही बरोबर घेतल्या जात आहे. ताक किंवा दही नाहीतर ,वांग्याची भाजी अशा इतर पदार्थ आता शेतावर होत आहेत.
शेणाच्या गोवर्यांवर किंवा लाकडावर अथवा उसाच्या खोडव्यावर ज्वारीची कणसं भाजली जातात. पट्टीचे हुरडा खाणारे गरम कणीस थेट हातावर घेऊन, चोळून त्यातील चवदार दाणे बाहेर काढतात आण ित्याचा आस्वाद घेतानाचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे
ज्वारीचं आहारातील महत्त्व
ज्वारीमध्ये खूप जास्त तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे कोठा साफ राहतो. पोट भरल्यासारखं वाटून भूक कमी लागते आण िआपोआप आहारावर नियंत्रण येतं. वजन कमी होवून कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.ज्वारीत मोठ्या प्रमाणावर लोहदेखील असतं.
ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ते शक्तीवर्धक असतं.
 

Web Title: Hoorada party thrust into Yeola taluka in cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.