शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

निनादचा योग्य सन्मान व्हावा अन् अशी चूक पुन्हा नको : अनिल मांडवगणे

By अझहर शेख | Published: May 22, 2019 4:28 PM

वीरमरणाचा सरकारने उचित सन्मान करावा आणि भारतीय सैन्याने यंत्रणेतील दोष निवारण करून यापुढे अशी चूक घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी भावना निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देहवाई दलाकडूनच क्षेपणास्त्र या हेलिकॉप्टरच्या दिशेने डागलेदेशाचा सैनिक सहजासहजी घडत नसतो. वायुसेना एक कुटुंबाप्रमाणे

अझहर शेख, नाशिक : काश्मीरमधील बडगाम येथे २७ फेब्रुवारी रोजी सकाळी भारतीय वायुदलाच्या लढाऊ एमआय-१७ व्ही-५ हेलिकॉप्टरला अपघात होऊन नाशिकच्या डीजीपीनगरमधील सहवैमानिक स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यासह सहा जवानांना वीरमरण आले. देशाच्या संरक्षणासाठी निनादने आपले बलिदान दिले आहे. त्याच्या वीरमरणाचा सरकारने उचित सन्मान करावा आणि भारतीय सैन्याने यंत्रणेतील दोष निवारण करून यापुढे अशी चूक घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी भावना निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी जम्मूच्या राजौरी सेक्टरच्या दिशेने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याचदिवशी मिशनवर असलेले निनाद व त्याचे सहकारी जवानांचे लढाऊ हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे वृत्त आले होते; मात्र आता शत्रूचे हेलिकॉप्टर समजून हवाई दलाकडूनच क्षेपणास्त्र या हेलिकॉप्टरच्या दिशेने डागले गेल्याचे चौकशीत पुढे येत आहे. याप्रकरणी एका वरिष्ठ अधिका-यावर वायुसेनेने कारवाईदेखील केल्याचे समजते.

देशाचा सैनिक सहजासहजी घडत नसतो. स्क्वॉड्रन लीडर या पदावरील अधिकारी घडविण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यासाठी कठोर परिश्रम वायुदलाला घ्यावे लागतात. त्यामुळे निनादच्या रूपाने आमच्या कुटुंबासह देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली. निनाद यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले, त्याच्या दुस-या दिवशी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घरी पुन्हा भेट देऊन निनाद यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी माहिती दिली होती, असे मांडवगणे यांनी सांगितले. वायुसेना एक कुटुंबाप्रमाणे असून, मुलगा गमावल्याचे जसे दु:ख आम्हाला आहे, तसे भारतीय वायुसेनेलाही उत्तम वैमानिक गमावल्याचे दु:ख असल्याचे मांडवगणे म्हणाले.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकairforceहवाईदलMartyrशहीदNashikनाशिकIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर