शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

भीमोत्सवात उमटला चळवळीचा इतिहास

By admin | Updated: April 10, 2017 01:43 IST

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्कार्य या गीतकारांनी केले आहे.

नाशिक : आंबेडकरी चळवळीत भीमगीतकारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्कार्य या गीतकारांनी केले आहे. त्यांच्यामधील त्याग, समर्पण यातूनच ही चळवळ समृद्ध झाली. या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी केले. गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.९) ब्ल्यू लायन फाउंडेशन आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय भीमोत्सवात उद्घाटक म्हणून डॉ. कांबळे बोलत होते. याप्रसंगी डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, कोणतीही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा त्याग, समर्पण महत्त्वाचा असतो. आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देण्यासाठी गेल्या ५0 वर्षात भीमगीतकार, आंबेडकरी शाहीर आणि जलसाकार यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आंबेडकरी चळवळ शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी या कलावंतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करून परिवर्तनाची चळवळ वेगवान केली आहे. सत्यशोधकी जलसाचा वारसा स्वीकारून आंबेडकरी जलसाने मनोरंजनाऐवजी अंधश्रद्धेवर प्रहार करीत समाज प्रबोधनाचे कार्य केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी अविनाश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गंगाधर अहिरे होते. याप्रसंगी प्रा. अहिरे यांनी मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्त आंबेडकरी बाण्याचे कवी व शाहीर यांच्या चळवळीतील योगदानाला उजाळा देण्यासाठी या भीमोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने या कार्याला एकप्रकारे नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. याप्रसंगी उद्घाटन सत्रात बुद्धभूषण साळवे यांच्या बाजार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास नितीन भुजबळ, अजित अभंग, कैलास दाभाडे, कविता थोरात आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जयश्री बागुल व किशोर शिंदे यांनी केले. प्रमोद पवार यांनी आभार मानले.