सुकेणे येथील पुरातन पारांचा जीर्णोद्धार इतिहासाचे साक्षीदार : ज्येष्ठ नागरिक संघाने घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:05 AM2018-03-05T00:05:51+5:302018-03-05T00:05:51+5:30

कसबे सुकेणे : मौजे सुकेणेच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व विकास जडणघडणींचे साक्षीदार असलेले येथील दोन पुरातन पारांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारातून जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

History of the ancient ponds restored in Sukenai history: Senior Citizen's initiative | सुकेणे येथील पुरातन पारांचा जीर्णोद्धार इतिहासाचे साक्षीदार : ज्येष्ठ नागरिक संघाने घेतला पुढाकार

सुकेणे येथील पुरातन पारांचा जीर्णोद्धार इतिहासाचे साक्षीदार : ज्येष्ठ नागरिक संघाने घेतला पुढाकार

Next
ठळक मुद्देगोकुळाष्टमी उत्सवासाठी या पारांची बांधणीज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेत पारांचा जीर्णोद्धार केला

कसबे सुकेणे : मौजे सुकेणेच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व विकास जडणघडणींचे साक्षीदार असलेले येथील दोन पुरातन पारांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारातून जीर्णोद्धार करण्यात येत आहे. शेकडो वर्षांची परंपरा आणि उत्सव ,सोहळे साजरे करणाºया श्रीक्षेत्र मौजे सुकेणे गावात पेशवे काळापासून गावाच्या प्रथमदर्शनी भागात दोन पार (चबुतरा) आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.
दत्त प्रभूंच्या पालखी विसावा आणि गोकुळाष्टमी उत्सवासाठी या पारांची बांधणी त्या काळात केली गेली होती. सवत या मराठी चित्रपटातील निळू फुलेंवरील काही दृश्यांचे या पारावर चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामुळे रुपेरी पडद्यापासून ते थेट विविध राजकीय सभा, सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक घटनांचा हा साक्षीदार असलेल्या या दोन पारांचे मौजे सुकेणेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे या गावात दोन पार असून, या दोन पारांची मध्यंतरी पडझड झाली होती. त्यांच्या दुरुस्तीसाठी गावातील ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेत पारांचा जीर्णोद्धार केला. महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर, संघाचे अध्यक्ष बाबूराव लक्ष्मण मोगल, बापूसाहेब मोगल यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साहेबराव गडाख, बी. जी. भंडारे, भास्कर मोगल, पांडुरंग रहाणे, अण्णासाहेब मोगल, विष्णुपंत उगले, उत्तम देशमुख, रामकृष्ण बोंबले आदींसह ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: History of the ancient ponds restored in Sukenai history: Senior Citizen's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास