एकलहरे : हिंगणवेढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग सूर्यभान धात्रक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच वाल्मीक जयवंत धात्रक यांनी मुदत संपण्यापूर्वीच उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामसेविका अनिता धनराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच सुमन राजाराम धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
हिंगणवेढे उपसरपंचपदी धात्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:54 IST