महामार्ग दुभाजकांत कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 13:12 IST2018-03-22T13:12:56+5:302018-03-22T13:12:56+5:30

कचरा जाळण्याचा प्रकार सर्रास

Highway dividers in the trash empire | महामार्ग दुभाजकांत कचऱ्याचे साम्राज्य

महामार्ग दुभाजकांत कचऱ्याचे साम्राज्य

ठळक मुद्देकचरा जाळण्याचा प्रकार सर्रास


नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील दुभाजकांवर वेळोवेळी साफसफाई केली जात नाही. याठिकाणी सुकलेले गवत, पालापाचोळा आणि प्रवाशांनी फेकलेला कचरा यांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय बऱ्याच ठिकाणी तर कचरा आणि गवत जाळून सफाई करण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे दुभाजकांवर लावलेल्या झाडांच्या पानांना झळा बसत आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दुभाजकांची नियमित सफाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांनी केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर रस्त्याच्या मधोमध, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुभाजक आहे. त्याठिकाणी झाडेदेखील लावण्यात आलेली आहेत. पण योग्यप्रकारे काळजी घेतली जात नसल्यामुळे सदर झाडांची वाढ होत नाही. शिवाय झाडांच्या आजूबाजूला वाढलेले गवत व कचरा उचलला जात नाही. या समस्येकडे स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेदेखील दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दुभाजकांची तत्काळ सफाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

Web Title: Highway dividers in the trash empire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.