कोरोनो रोखण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 07:07 PM2020-04-12T19:07:36+5:302020-04-12T19:11:22+5:30

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने मोबाईल क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनव्दारे महापालिकेला कोरोना ...

Helpline on behalf of Nashik Municipal Corporation to prevent Corono | कोरोनो रोखण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने हेल्पलाईन

कोरोनो रोखण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने हेल्पलाईन

Next
ठळक मुद्देवैद्यकिय मदत मिळणारनागरीकांचे सर्वेक्षणही होणार

नाशिक- कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने मोबाईल क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनव्दारे महापालिकेला कोरोना सदृष्ट आजार असणाऱ्या नागरीकांपर्यंत पोहोचता येईलच परंतु संबंधीत नागरीकांना देखील वैद्यकिय मार्गदर्शन घेता येणार आहे.

नाशिक महापालिकेने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यापूर्वीही तयार केलेले अ‍ॅप तयार केले असून महाकवच अ‍ॅप तर राज्यशासनाने स्विकारले आहे. सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी अत्याधुुनिक आयव्हीआर व बल्क एसएमएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे त्या अंतर्गत ९८२११८८१८९ या क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर नागरीक महापालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊ शकतात. महापालिकेच्या वतीने शहरातील नागरीकांचा सर्वे करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या बल्क एसएमएस प्रणालीव्दारे नागरीकांना covid19.nmc.gov.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लिंक उघडल्यानंतर त्यात एक फॉर्म दिसेल. त्यात नागरीकांनी आॅनलाईन माहिती भरावी तसेच त्या माहितीच्या आधारे कोरोना सदृष्य आजार असलेल्या नागरीकांपर्यंत महापालिकेला पोहोचून वैद्यकिय मदत उपलब्ध करून देता येईल. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोरोना विषाणुची संसर्ग साखळी तोडण्यास मदत केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी या सर्वे लिंकचा वापर करून आरोग्यविषयक माहिती भरून द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

या प्रणालीची वैशिष्टये म्हणजे आयव्हीआर प्रणालीचे वैशिष्टय म्हणजे इंटरॅक्टीव्ह व्हाईस रिस्पॉन्स सिस्टीमचा वापर असून चोवीस तास सेवा उपलब्ध आहे. हेल्पलाईनवर तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असेल तसेच कोवीड १९ या आजाराची माहिती नागरीकांना मिळेल. कोरोनाबाबतचे रूग्णालये आणि संपर्क क्रमांक उपलब्ध होतील. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि होम कोरंटाईन तसेच अलगीकरणाची माहिती देखील उपलब्ध होईल.

Web Title: Helpline on behalf of Nashik Municipal Corporation to prevent Corono

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.