‘त्या’ चिमुकल्यांच्या वारसदारांना वनविभागाकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:57 IST2020-05-15T16:54:43+5:302020-05-15T16:57:43+5:30

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास संबंधितांच्या वारसदारांना १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.

Helping hand from the forest department to the heirs of 'those' Chimukals | ‘त्या’ चिमुकल्यांच्या वारसदारांना वनविभागाकडून मदतीचा हात

‘त्या’ चिमुकल्यांच्या वारसदारांना वनविभागाकडून मदतीचा हात

ठळक मुद्देदहा वर्षांची असते मुदत ठेवमनुष्यहानी झाल्यास १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

नाशिक : पंधरवड्यापुर्वी भगुरजवळील दोनवाडे गावात शिरोळे कुटुंबातील चिमुकला रूद्र तसेच त्याअगोदर दहा ते बारा दिवसांपुर्वी हिंगणवेढे येथील पगारे कुटुुंबाचा एकुलता एक कुणाल हा शाळकरी मुलगा बिबट हल्ल्याचे बळी ठरले. या दोन्ही कुटुंबियांना नाशिक पश्चिम वनविभागाकडून पहिल्या टप्प्यातील तत्काळ दिली जाणारी पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली.

भगूर गावाजवळील दोनवाडे येथे उसशेतीला लागून असलेल्या शिरोळे यांच्या घराच्या ओट्यावर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या रूद्रवर १ मे रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात रूद्रचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली गेली. हातावरील मोलमजुरी करणार शिरोळे कुटुंबियांना नाशिक पश्चिम वनविभागाने शासननियमानुसार आर्थिक मदतीचा हात दिला आहे. रुद्रचे वडील राजेश शिरोळे यांना सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांनी पाच लाखांचा धनादेश प्रदान केला. यावेळी वनपाल मधुकर गोसावी उपस्थित होते. हिंगणवेढा येथील पगारे कु टुंबियांनाही पाच लाखांपैकी उर्वरित दोन लाखांचा धनादेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना यापुर्वी उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश देण्यात आला होता. वन्यप्राणी हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना पहिल्या टप्प्यातील तत्काळ मदत म्हणून पाच लाखांचा धनादेश देण्याची तरतूद शासकिय नियमानुसार करण्यात आली आहे.


....अशी आहे अर्थसहाय्याची तरतूद
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास संबंधितांच्या वारसदारांना १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. यापैकी तीन किंवा पाच लाख रुपयांचा धनादेश तत्काळ वारसदारांना वनविभागाकडून सुपुर्द केला जातो. उर्वरित बारा किंवा दहा लाखांची रक्कम राष्टÑीयकृत बॅँकेत असलेल्या वारसदारांच्या खात्यावर दरमहा व्याज मिळेल या स्वरूपात ‘फिक्स डिपॉझिट’ (एफडी) स्वरूपात जमा केली जाते.

दहा वर्षांची असते मुदत ठेव
पाच लाख रूपयांची मुदत ठेव पाच वर्षांकरिता व उर्वरित पाच लाखांची मुदत ठेव १० वर्षांकरिता असते. दहा वर्षानंतर वारसदारांना पुर्ण रक्कम मिळते. त्यासाठी उपवनसंरक्षक यांचा नाहरकत दाखल त्यावेळी उपवनसंरक्षक हे मुदतीपुर्व वारसदारांना अत्यावश्यक गरज भासल्यास त्याची खात्री करून रक्कम काढण्याची मुभा देऊ शकतात. त्यावेळी त्यांचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते. २०१८ साली यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या वाघिणीच्या हल्ल्याच्या घटनेनंतर अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करण्यात आली.
 

Web Title: Helping hand from the forest department to the heirs of 'those' Chimukals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.