नाशिक - लॉक डाऊन आणि संचार बंदीमुळे समाजातील सर्वच घटकांची अडचण होत असताना महापालिकेने दिव्यांगांना रोख रक्कम आण् ितसेच अन्न धान्य पुरवून मोठा आधार दिला आहे. सुमारे २६ लाख रूपयांचा लाभ देतानाच महापालिकेने विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने ९५० दिव्यांग कुटूबांना धान्य पुरवले आहे.लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे शहरातील सर्व उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे सामान्य नागरीकांचे हाल होेत आहे. दिव्यांग व्यक्तींची तर अधिकच अडचण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दिव्यांग आणि ज्येष्ठनागरीकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन दिली होती. शिवाय महपाालिकेच्या समाज कल्याण खात्या मार्फतदेखील पात्रलाभार्थींना मदत करण्यात आली आहे. या विभागाच्या वतीने ६४० पात्र लाभार्थींना प्रत्येकी दोन हजार तसेच अन्ययोजनांच्या अंतर्गत पात्र ठरलेल्या ३७ दिव्यांगांना मिळूून एकुण १९ लाख वीस हजार रूपये आरटीजीएस व्दारे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. निराधार, विधवा, घटस्फोटीत महिलांच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत त्यांच्यापाल्यांच्या शिक्षण शिष्यवृत्ती करीता ६ लाख ६० हजार इतके अर्थसहाय्य त्यांच्या बॅँक खात्यामार्फत आरटीजीएसव्दारे जमा करण्यात आले आहेत. अनेक दिव्यांगांना अन्न धान्याची गरज असल्याने त्यांना शहरातील विविध एनजीओच्या मदतीने धान्य पुरवण्यात आले एकुण ९५० दिव्यांग कुटूंबांना धान्याचे किट घरपोच देण्यात आले आहे. ऐन संकटात दिव्यांगांना मदत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.--
ऐन अडचणीत महापालिकेडून दिव्यांगांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:15 IST
घटस्फोटीत महिलांच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत त्यांच्या पाल्यांच्या शिक्षण शिष्यवृत्ती करीता ६ लाख ६० हजार इतके अर्थसहाय्य त्यांच्या बॅँक खात्यामार्फत आरटीजीएसव्दारे जमा करण्यात आले आहेत.
ऐन अडचणीत महापालिकेडून दिव्यांगांना मदतीचा हात
ठळक मुद्देलाभार्थींच्या खात्यावर रक्कम९५० कुटूंबांना घरपोच धान्य