जखमी सैनिकांना मदतीचा संकल्प

By Admin | Updated: September 26, 2016 23:38 IST2016-09-26T23:37:54+5:302016-09-26T23:38:22+5:30

चांदवड : सत्संग सेवा समितीतर्फे रक्तदान शिबिर

Help to the injured soldiers | जखमी सैनिकांना मदतीचा संकल्प

जखमी सैनिकांना मदतीचा संकल्प

चांदवड : तालुका सत्संग सेवा समिती व नाशिक जिल्हा सत्संग सेवा समिती यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त महारक्तदान शिबिर झाले. अध्यक्षस्थानी तुकाराम सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपनगराध्यक्ष कविता उगले, संदीप उगले, जिल्हा परिषद सदस्य विलास माळी, तालुका सत्संग सेवा समिती अध्यक्ष सुभाष पूरकर, हिरामण शेळके, हरिभाऊ ठाकरे, माणिक थोरे, उत्तमराव ठाकरे, शंकरराव गांगुर्डे उपस्थित होते. यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित करून सीमेवरील जखमी सैनिकांवर उपचारार्थ ५० हजार रक्तबाटल्या पाठविण्याचा संकल्प करून त्यासाठी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यात १५० बाटल्या संकलित झाल्या. तसेच राज्यातून ५५ हजार देहदान अर्ज आले. त्यात नाशिक जिल्ह्यातून सात हजार ५००, चांदवड तालुक्यातून ४०० फॉर्म, तर आतापावेतो सहा देहदान झाले आहेत.
यावेळी जिल्हा समितीप्रमुख अ‍ॅड. योगेश शिरसाठ, डॉ. राजपूत, कुलकर्णी, आनंद आव्हाड, श्रीमती बच्छाव, श्रीमती मीना, श्रीमती मरडे, पैठणकर, जोशी, मोरे, सरला ठाकरे, पूरकर, नितीन शेळके, भोसले, केशव सोनवणे, योगेश शिरसाठ, कविता पवार व युवक, भाविक, साधक उपस्थित होते. (वार्ताहर)
 

Web Title: Help to the injured soldiers