शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

विना हेल्मेट दुचाकीस्वारांची ‘शाळा’

By admin | Updated: January 12, 2017 01:06 IST

निबंधलेखन स्पर्धा : ‘फायदे कळतात; पण वळत नाही’ हे मोहिमेतून अधोरेखित

नाशिक : मुळात ज्यांनी हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करीत दुचाकी रस्त्यावर आणल्या, अशा दुचाकीस्वारांची जेव्हा वाहतूक पोलिसांनी ‘शाळा’ भरविली तेव्हा मात्र त्यांनी ‘हेल्मेट चे फायदे’ या विषयावर मुद्देसूद निबंधलेखन केले, अशा बहाद्दरांचे निबंध पोलीस अधिकाऱ्यांनी वाचले तेव्हा तेदेखील अवाक् झाले. हेल्मेटविषयीचे ज्ञान असून त्याच्या वापराकडे दुर्लक्ष नाशिककर का करतात, असा प्रश्न यावेळी पोलिसांना पडला. ‘हेल्मेटमुळे संरक्षण होते’, ‘अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होत नाही’, ‘हेल्मेटमुळे दुचाकीस्वाराचे प्राण वाचते’, ‘वायू प्रदूषणापासून संरक्षणासाठी हेल्मेट उत्तम...’ असे मत शाळकरी विद्यार्थ्यांनी नोंदविले तर त्यात नावीन्य नाही; मात्र हे विचार जे नाशिककर हेल्मेट वापरत नाही त्यांनी स्वत:च्या शब्दांमध्ये व्यक्त केले हे विशेष! निमित्त होते, ‘त्या’ नाशिककरांसाठी वाहतूक पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘हेल्मेटचे फायदे’ या विषयावरील निबंध स्पर्धेचे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे पालन व त्याबाबत जनजागृती करण्यावर शहर वाहतूक विभागाकडून भर दिला जात आहे. वाहतूक पोलिसांनी बुधवारी (दि. ११) सकाळी मुंबई नाका येथे असाच एक प्रबोधनपर अभिनव उपक्रम निबंध स्पर्धेच्या माध्यमातून राबविला. नाशिककरांना ‘हेल्मेट’ कळतेय पण वळत नाही, असे यावेळी अधोरेखित झाले.
हेल्मेटचा वापर कायद्याने बंधनकारक आहे. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे हेल्मेटच्या वापरामुळे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्यास मदत  होते.  नागरिकांनी किमान आपला व आपल्या कुटुंबीयांचा विचार करून हेल्मेटचा वापर दुचाकी चालविताना करणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील यांनी यावेळी वर्गात केले. सहायक आयुक्त जयंत बजबळे, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, शंकर काळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)