शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:54 IST

श्रमजीवींचे निवेदन : ग्रामीण भागात मोठे नुकसान

ठळक मुद्देलोकांना नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने अजूनही काही लोक पडक्याच घरात राहत आहेत.

शेणीत : इगतपुरी तालुक्यातील असंख्य गावांमध्ये गेल्या चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना भाकड यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गेल्या चार महिन्यांत अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतपिकांबरोबरच ग्रामीण भागातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. अनेक कुटुंबांना पावसाच्या पाण्यातच घरात राहावे लागले तर काही लोक बेघर झाले. या घरांच्या पडझडीबाबत नुकसानग्रस्त रहिवाशांनी स्थानिक तलाठीमार्फत पंचनामा करून प्रकरण तहसीलदार यांच्याकडील कार्यालयात जमा केले आहे. त्यात घोटी बुद्रुक २, शिरसाठे गाव ७, मोडाळे गाव १२, पांगुळगाव १, परदेश वाडी ३, खेड १, कुरनगवाडी १, गोंदे दुमाला ३, मुरंबी २०, कुशेगाव २, आधारवड ४, धारगाव ३, धामणगाव १२,नांदगाव सदो ३, बोरली २, पाडळी १०, मालुंजे ९, मोगरे ४, मांजरगाव १०, वालवीर ४२, कांचनगाव १५, काळुस्ते ४८ यासह अडसरे, शिरसाठे, मोडले, खेड, बेलगाव कुºहे, शेणीत, खडकेद, टाकेद अन्य गावांतील २९६ नुकसान बाधित लोकांचे अर्ज तहसील कार्यालयात दाखल आहेत. मात्र, त्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. लोकांना नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने अजूनही काही लोक पडक्याच घरात राहत आहेत. नुकसानग्रस्त लोकांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, संजय ठोंबरे, शांताराम भगत यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस