अभोण्यात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:44 IST2021-04-29T21:43:38+5:302021-04-30T00:44:26+5:30
अभोणा : शहर परिसरात वेगवान वारा व मेघगर्जनेसह गुरुवारी (दि. २९) दुपारी ४.३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. टपोऱ्या थेंबांनी बरसणाऱ्या या पावसाने काही क्षणात शहरातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. पावसाचा वेग तासभर कायम होता. शहरातील वीज पुरवठा अचानक खंडित झालेला असतानाच आलेल्या या पावसाने नागरिकांच्या अडचणीत भरच पडली.

अभोण्यात मुसळधार पाऊस
अभोणा : शहर परिसरात वेगवान वारा व मेघगर्जनेसह गुरुवारी (दि. २९) दुपारी ४.३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. टपोऱ्या थेंबांनी बरसणाऱ्या या पावसाने काही क्षणात शहरातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले.
पावसाचा वेग तासभर कायम होता. शहरातील वीज पुरवठा अचानक खंडित झालेला असतानाच आलेल्या या पावसाने नागरिकांच्या अडचणीत भरच पडली. गेल्या तीन दिवसांपासून शहरासह तालुक्यात होत असलेल्या या अवकाळी पावसाने उन्हाळ कांदा, मिरची, टोमॅटो यासह भाजीपाला पिकांचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले असून ऐन कोरोनाच्या महामारीत आधीच अडचणीत आलेल्या बळीराजाचे अस्मानी संकटानेही कंबरडे मोडले आहे.