गारपीट, अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By Sandeep.bhalerao | Published: November 27, 2023 04:26 PM2023-11-27T16:26:26+5:302023-11-27T16:27:44+5:30

आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार

Heavy crop damage due to hail unseasonal rain Guardian Minister order to make Panchnama | गारपीट, अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

गारपीट, अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

संदीप भालेराव, नाशिक: रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे पालकमंत्री दादा भुसे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, कृषी सहायक योगेश निरभवणे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात यावेत, ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करावी, कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

Web Title: Heavy crop damage due to hail unseasonal rain Guardian Minister order to make Panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस