शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजार झाला सुना सुना

By admin | Updated: November 11, 2016 23:03 IST

आठवडे बाजार झाला सुना सुना

सुरगाणा : ग्रामीण भागातील नागरिकांची कोंडी सुरगाणा : शुक्रवारी येथील आठवडे बाजार असल्याने तालुका परिसरातून आलेल्या नागरिकांची ५०० व १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी येथील पोस्ट कार्यालय तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मोठी गर्दी झाली होती.बाजारात विविध व्यावसायिकांची आणि ग्राहकांचीही गर्दी जवळ मोठ्या नोटा आहेत; पण सुटे मिळत नसल्याने साधी भाजी खरेदी करणेही ग्राहकांना कठीण होऊन बसले आहे. हीच परिस्थिती बहुतांश व्यावसायिकांचीदेखील निर्माण झाली होती. किराणा किंवा इतर व्यापारी मोठ्या नोटा घेत असल्याने घाऊक खरेदी करताना ग्राहकांची फारशी अडचण झाली नाही. मात्र खरी आर्थिक अडचण झाली ती छोटे विके्रते आणि किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची. काहींना केसपेपर काढण्यासाठी, कोणाला गावाला जाण्यासाठी अशा विविध बाबीकरिता सुटे पैसे मिळत नसल्याने आणि नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत प्रचंड गर्दीमुळे नंबर लागत नसल्याने असंख्य नागरिकांची आर्थिक कोंडी झाली.कुणाला दुसऱ्याकडून रक्कम घ्यायची आहे; पण नवीन नोटा येईपर्यंत घेणेकऱ्याला वाट पहावी लागणार आहे, तर देणेकरी मात्र काहीसा सुखावला आहे. पोस्टातही मोठी गर्दी झाली होती. मात्र येथे शंभरच्या नोटा दुपारपर्यंत संपल्या होत्या. त्यामुळे अनेकांना माघारी फिरावे लागले. येथील देना बँक आणि महाराष्ट्र बँकेतही नोटा बदलून घेण्यासाठी व खात्यावर रक्कम भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.एका विद्यार्थिनीला नाशिकला जायचे होते. मात्र जवळ सुटे पैसे नव्हते. निदान पाचशेचे सुटे मिळाले तरी तिच्यासाठी ते अनमोल होते. पण कुठूनही सुटे मिळत नव्हते. शेवटी ती महाराष्ट्र बँकेत गेली. तर तिथे तोबा गर्दी. नाशिक जाणे रहीत करण्याची वेळ आली. अखेर त्याचवेळी तिला एका परिचिताकडून शंभरच्या चार आणि दहाच्या दहा नोटा असे केवळ पाचशेचे सुटे मिळताच तिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती नाशिकला रवाना झाली. यासारख्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)