शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य महाकुंभाला सेवाभावी संस्थांची मदत

By admin | Updated: December 31, 2016 01:07 IST

गिरीश महाजन : महाआरोग्य शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : जिल्ह्यातील विविध भागांतील रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळावी व विविधा विकारांपासून जनसामान्यांची सुटका व्हावी या हेतूने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर आरोग्य सप्ताह राबविण्यात येत असून, त्यानंतर रविवारी (दि.१) गोल्फ क्लब मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, विविध सेवाभावी संस्था आणि उद्योजकांच्या मदतीने हा आरोग्याचा महाकुंभ यशस्वी होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.  गोल्फ क्लब मैदानावर महाआरोग्य शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, पालकमंत्र्यांनी शुक्रवारी संध्याकाळी शिबिराच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य शिबिरामध्ये विविध स्थानिक खासगी व शासकीय रुग्णालयांसह वैद्यकीय महाविद्यालयातील एक हजार डॉक्टर रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहे.  तसेच मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू सांरख्या शहरातून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुमारे साडेचारशे डॉक्टरही या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत. यात ६ ते ७ पद्मश्री पुरस्कार डॉक्टरांचा समावेश आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ७० ते ८० हजार रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळणार असून, यात रुग्णांच्या तपासणीपासून उपचार आणि गरज असल्यास शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या रुग्णांना महिनाभरात गरजेनुसार नाशिकसह पुणे, मुंबईमध्येही शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णांच्या वाहतुकीसाठी ५०० वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)