जुने सिडको येथे आरोग्य तपासणी

By Admin | Updated: September 29, 2016 00:00 IST2016-09-28T23:59:56+5:302016-09-29T00:00:25+5:30

जुने सिडको येथे आरोग्य तपासणी

Health Check-up at Old CIDCO | जुने सिडको येथे आरोग्य तपासणी

जुने सिडको येथे आरोग्य तपासणी

नाशिक : शिवाजी चौक, जुने सिडको येथे सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विशेष करून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत शिबिर राबविण्यात आले. सदरील योजनेविषयी परिसरातील नागरिकांना व रुग्णांना माहिती देण्यात आली. सायखेडकर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णाची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिराचे आयोजन धनंजय बडदे यांनी केले. यासाठी पंकज तिडके, सविता पाटील, योगीता निकुंभ, वसंत बाफना, अजय सोनवणे, प्रल्हाद सस्ते यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)

Web Title: Health Check-up at Old CIDCO