शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांचा आज मोर्चा

By admin | Updated: January 24, 2016 23:59 IST

मान्यतावर्धितला विरोध : वेठीस धरीत असल्याचा आरोप

सिन्नर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने सर्व शाळांना सांकेतिक क्रमांक म्हणजेच मान्यता दिली असताना पुन्हा नवीन सांकेतिक क्रमांक (मान्यतावर्धित) मिळविण्यासाठी लेखी सूचना काढल्या आहेत. या प्रस्तावाच्या प्रती शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनांसह सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली असून, या निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघटनांसह सर्व संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सोमवारी (दि. २५) नाशिक येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मान्यतावर्धित करण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील शाळांच्या वार्षिक तपासणी अहवालाची मागणी केली जाते. शाळा तपासणीसाठी अधिकारी येत नाही. शिक्षण विभागाकडून काही शाळांची दहा वर्षांपासून तपासणी झालेली नाही. मुख्याध्यापकांना शिक्षण विभागातील लिपिक वेठीस धरतात. प्रस्ताव स्वीकारले जात नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांची कुचंबणा होत असल्याची तक्रार मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. मोर्चात ५०० ते ६०० मुख्याध्यापक व सर्व संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. शिरसाठ, कार्यवाह एस. बी. देशमुख, के. के. अहिरे, आर. डी. निकम, एस. डी. शेलार, एस. के. सावंत, एस. एम. बच्छाव, शरद गिते, राजेंद्र लोंढे, सी. पी. कुशारे, ए. बी. काटे, माणिक मढवई, ए. के. कदम यांच्यासह मुख्याध्यापक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)