मुख्याध्यापकास शिक्षकाकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 01:13 IST2021-09-11T01:12:34+5:302021-09-11T01:13:05+5:30

दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

Headmaster beaten by teacher | मुख्याध्यापकास शिक्षकाकडून मारहाण

मुख्याध्यापकास शिक्षकाकडून मारहाण

दिंडोरी : तालुक्यातील कादवा म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कादवा म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक भास्कर जाधव हे शालेय वेळेत कामकाज करत असताना, त्यांच्याच शाळेतील एका शिक्षकाबरोबर शालेय कामकाज पूर्ण करण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. मुख्याध्यापक जाधव यांना बेदम अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या शिक्षकीपेशाला काळिमा फासणाऱ्या घटनेचा

 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सदर व्हिडिओ समाज माध्यमात प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. दिंडीरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Headmaster beaten by teacher