नाशिक : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नाशिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने पेठे विद्यालयातच्या प्रांगणात गुरुवारी (दि. २३) सत्कार करण्यात आला. यावेळी सदगीर यांना धनादेश, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, अॅॅड.गोरखनाथ बलकवडे उपस्थित होते. यावेळी रहाळकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या कुस्ती खेळातील योगदानाबद्दल माहिती दिली. सदगीर यांनी संस्था व ति.झं.विद्यामंदिर शाळेच्या नावलौकिकात भर पडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदगीर यांनी यावेळी असे सांगितले की, मेहनत व इच्छाशक्ती याच्या बळावर यश मिळवता येते असे सांगितले. बलकवडे यांनी शारीरिक क्षमतांच्या जोरावर बुद्धी व युक्ती वापरून आयुष्यात यशस्वी होता येते असे सांगितले. आमदार ढिकले यांनी आपल्या बालपणाच्या शालेय आठवणींना उजाळा देऊन स्वत:च्या कुस्ती खेळाबद्दलच्या आवडीची माहिती दिली. आमदार फरांदे यांनी नाशिक मधील तालीम विकासाबद्दल माहिती दिली. यावेळी संस्था विश्वस्त रमेश चांदवडकर, कार्यवाह राजेंद्र निकम, ति.झं.विद्यामंदिर शाळेचे विश्वास बोडके, सरोजिनी तारापूरकर, वि.भा.देशपांडे, एल.एस.जाधव, दिलीप अहिरे, मुख्याध्यापिका प्रियंका निकम आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक क्र ीडा समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर यांनी केले. सूत्रसंचालन संस्था शिक्षणाधिकारी शैलेश पाटोळे यांनी तर आभारप्रदर्शन संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी केले.
पेठे विद्यालयात हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 16:36 IST
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नाशिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने पेठे विद्यालयातच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला.
पेठे विद्यालयात हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार
ठळक मुद्देमहाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा पेठे विद्यालयात सत्कार मेहनत व इच्छाशक्ती याच्या बळावर यश मिळवता येतेबुद्धी व युक्ती वापरून आयुष्यात यशस्वी होता येते