शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

खंडग्रास सूर्यग्रहण न दिसल्याने हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:47 IST

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शनच झाले नाही आणि नऊ वर्षांनंतर आलेले खंडग्रास सूर्यग्रहण मालेगावकरांना दिसू न शकल्याने त्यांच्या हिरमोड झाला. यात नागरिकांनी दूरदर्शनवर जगभरातील सूर्यग्रहणाचा लाभ घेऊन आनंद घेतला. सरत्या वर्षाला निरोप देताना निसर्गाचा अविस्मरणीय असा आविष्कार याची देही याची डोळा बघण्याची संधी होती. मात्र सकाळपासूनच आभाळ भरून आल्याने सूर्यदर्शनच झाले नाही. खंडग्रास सूर्यग्रहणाचा अद्भूत नजराणा डोळ्यात साठविण्याची संधी निसर्गानेच दिली नाही आणि समस्त मालेगावकरांना या संधीपासून मुकावे लागले.

ठळक मुद्देमालेगाव : ग्रहण दर्शनात धुक्याचा अडसर

संगमेश्वर : आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शनच झाले नाही आणि नऊ वर्षांनंतर आलेले खंडग्रास सूर्यग्रहण मालेगावकरांना दिसू न शकल्याने त्यांच्या हिरमोड झाला. यात नागरिकांनी दूरदर्शनवर जगभरातील सूर्यग्रहणाचा लाभ घेऊन आनंद घेतला.सरत्या वर्षाला निरोप देताना निसर्गाचा अविस्मरणीय असा आविष्कार याची देही याची डोळा बघण्याची संधी होती. मात्र सकाळपासूनच आभाळ भरून आल्याने सूर्यदर्शनच झाले नाही. खंडग्रास सूर्यग्रहणाचा अद्भूत नजराणा डोळ्यात साठविण्याची संधी निसर्गानेच दिली नाही आणि समस्त मालेगावकरांना या संधीपासून मुकावे लागले.तरीही अनेकांनी दूरदर्शनवर याचा आनंद घेतला. सकाळी ८ ते ११ या वेळेत पूजापाठ करण्यात वेळ घालविला. सकाळी ११ वाजेनंतर सूर्यग्रहण संपल्यानंतर अनेकांनी स्नान करून दानधर्म केले. शहरातील शाळांमधून विद्यार्थ्यांना दूरदर्शनवर सूर्यग्रहण दाखविले. मालेगाव कॅम्पातील बाल विद्या निकेतन शाळा, संगमेश्वरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा या संस्थांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दूरदर्शनवरील जगभरातील सूर्यग्रहण दाखविले. अति धुक्यामध्ये मालेगावात ग्रहण बघता आले नाही; मात्र आम्ही विद्यार्थ्यांना दूरदर्शनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दाखवून सूर्यग्रहणाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितल्याचे बालविद्या निकेतन शाळेचे मुख्याध्यापक नचिकेत कोळपकर यांनी सांगितले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सूर्यग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. ग्रहणावेळी कोणतेही धोकादायक किरणे बाहेर पडत नाहीत. ग्रहण म्हणजे खेळ सावल्यांचा या शब्दांत नागरिकांचे समाज माध्यम व इतर माध्यमातून प्रबोधन करून ग्रहणाच्या खगोलीय आविष्काराचा आनंद घेण्याचे आवाहन अंनिसच्या वतीने करण्यात आले होते.ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमी नाराजमालेगाव शहर व परिसरात मंगळवारी रात्री अचानक तुरळक पावसाचा शिडकावा झाला, तर बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. हेच वातावरण आज गुरूवारीही कायम राहिले. दुपारपर्यंत सूर्यनारायण ढगाआड राहिल्याने उन्हाचा पत्ता नव्हता. परिणामी नऊ वर्षांनंतर आलेले खंडग्रास सूर्यग्रहण याची देही याची डोळा बघण्याची संधी मालेगावकरांना मिळाली नाही. त्यामुळे खगोलप्रेमी नाराज झाले.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र