शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांकडून दिवाळी शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: October 25, 2016 23:54 IST

फलकबाजी : बायका - मुलांनाही आणले प्रकाशात

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी येऊ घातलेला दिवाळीचा सण म्हणजे महापर्वणीच. तीच संधी साधत इच्छुकांनी प्रभागातील घरोघरी दिवाळी शुभेच्छा देणाऱ्या पत्रकांचा वर्षाव सुरू केला असून, फलकबाजीलाही ऊत आला आहे. त्यातच काही नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आपल्या बायका-मुलांनाही प्रकाशात आणत यंदाची निवडणूक ही घराणेशाहीचे दर्शन घडविणार असल्याची झलक दाखविण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. महापालिका निवडणुकीत प्रभागाचा विस्तार व वाढलेली मतदारसंख्या पाहता उमेदवारांची मोठी कसोटी लागणार आहे. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असली तरी आतापासूनच निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यातच दिवाळीचा सण जवळ येऊन ठेपल्याने मतदारांपर्यंत जाऊन पोहोचण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी दिवाळी शुभेच्छा पत्रे छापत घरोघरी वाटप करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे घरोघरी शुभेच्छा पत्रांचा खच पडू लागला आहे. दिवाळी शुभेच्छा पत्र देताना त्यात आपल्या राजकीय पक्षाची निशाणी तसेच प्रभाग क्रमांकाचा आवर्जून उल्लेख केला जात आहे. याशिवाय, इच्छुकांकडून शहरात फलकबाजीलाही ऊत आला आहे. ठिकठिकाणी परस्पर पॅनल तयार करत अप्रत्यक्षपणे आपली उमेदवारी घोषित झाल्याचेच इच्छुकांकडून भासविले जात आहे. त्यातूनच पक्षांतर्गत धुसफूसही पहायला मिळत आहे. काही प्रस्थापित नगरसेवकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: रिंगणात उतरण्याची तयारी ठेवतानाच आपले वारसदार म्हणून बायका-मुलांनाही प्रकाशात आणले आहे. शुभेच्छा पत्रासह फलकांवर त्यामुळे कुटुंबच झळकत असून बायका-मुलांचीही उमेदवारीसाठी दावेदारी सांगितली जात आहे. इच्छुकांच्या या फलकबाजी व पत्रकबाजीने मतदारांचे मात्र निखळ मनोरंजन होत आहे. (प्रतिनिधी)