शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

फाळके स्मारकाचे उत्पन्न आले निम्म्यावर

By admin | Updated: May 4, 2017 00:49 IST

खर्च मात्र चौपट : लेझर शो बंद, कामगार संख्याही घटवली

नाशिक : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची पुरती रया गेली असून, उत्पन्न निम्म्यावर येऊन ठेपले आहे. खर्च मात्र चारपटीने वाढल्याने फाळके स्मारकाचे व्यवस्थापन सांभाळताना महापालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे. फाळके स्मारकातील लेझर शो बंद आहे. बीओटीवर दिलेल्या वॉटर पार्कची मुदतही संपण्याच्या मार्गावर आहे. महापालिका आयुक्तांनी फाळके स्मारक खासगीकरणातून चालविण्याचे संकेत दिले असले तरी अद्याप त्याला मुहूर्त लाभू शकलेला नाही. नाशिकचे भूमिपुत्र चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी महापालिकेने पांडवलेणीच्या पायथ्याशी सोळा-सतरा वर्षांपूर्वी फाळके स्मारकाची उभारणी केली. मुंबई-आग्रा महामार्गालगत असल्याने सुरुवातीला फाळके स्मारक पाहण्यासाठी मुंबई परिसरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असत. त्यावेळी वार्षिक उत्पन्न सुमारे ८५ ते ९० लाखांच्या आसपास प्राप्त व्हायचे. फाळके स्मारकातील संगीत कारंजा, लेझर शो, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, वॉटरपार्क आदी आकर्षणांमुळे पर्यटकांचा मोठा ओढा होता. परंतु, एकदा प्रकल्प उभारला की त्यानंतर ढुंकूनही न पाहणाऱ्या महापालिकेने फाळके स्मारकाकडे सातत्याने दुर्लक्ष केले. परिणामस्वरूप सद्यस्थितीत फाळके स्मारकाची पुरती रया गेली आहे. फाळके स्मारकाकडे पर्यटकांनी पाठ फिरविल्याने उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात फाळके स्मारकापासून महापालिकेला ४२ लाख ६३ हजार ८२० रुपये उत्पन्न प्राप्त झाले तर कामगारांच्या वेतनासह देखभाल- दुरुस्तीवर १ कोटी ५९ लाख ५९ हजार १७४ रुपये खर्च करावा लागला. उत्पन्न कमी आणि खर्च चौपट अशी स्थिती फाळके स्मारकाची बनली आहे. पर्यटकांनी पाठ फिरविल्याने महापालिकेने फाळके स्मारकातील कामगार संख्याही घटवली आहे. सन २००२ मध्ये फाळके स्मारकात महापालिकेचे ६ कर्मचारी कार्यरत होते. सद्यस्थितीत पाच कर्मचारी काम करतात. याशिवाय, साफसफाई व सुरक्षाविषयक काम मक्तेदारामार्फत केले जाते. त्यासाठी सन २००२ मध्ये कंत्राटी पद्धतीने ८७ कर्मचारी कार्यरत होते. ती संख्या आता २०१६ मध्ये ४५ वर आली आहे. त्यांच्याही वेतनाची मारामार आहे. महापालिकेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात फाळके स्मारक व बौद्ध स्मारकासाठी १ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली होती. सन २०१७-१८ या वर्षाच्या अंदाजपत्रकात २ कोटी १७ लाख ६८ हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी फाळके स्मारक खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचे संकेत दिले होते, परंतु अद्याप त्याला मुहूर्त लाभू शकलेला नाही. (प्रतिनिधी) वॉटरपार्कची मुदत संपण्याच्या मार्गावरमहापालिकेच्या फाळके स्मारकालगतच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वॉटरपार्क उभारण्यात आले होते. सदर वॉटरपार्क हे सन २००३ पासून १५ वर्षांच्या मुदतीसाठी ओशिएनिक एन्व्हायरो प्रा. लिमिटेड या संस्थेला बीओटी तत्त्वावर चालविण्यास दिलेले आहे. आता सदर मुदतही संपण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, फाळके स्मारकातील अ‍ॅम्पी थिएटर, कलादालन, खेळण्या, नाट्यगृहाची देखभाल- दुरुस्तीचे काम महापालिकेने भुयारी गटार योजना विभागाला देऊन मोठा विनोद केला आहे. सदर कामासाठी स्वतंत्र उपआयुक्त नेमून स्वतंत्र विभाग नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.