निगडोळ विद्यालयास दीड लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:47 IST2019-04-02T00:47:23+5:302019-04-02T00:47:47+5:30
निगडोळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरदरावजी पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास सभामंडप व व्यासपीठ बांधकामासाठी मंगेश वडजे यांनी दीड लाख रुपयांचा धनादेश शाळेला सुपुर्द केला.

निगडोळ येथील माध्यमिक विद्यालयास मंगेश वडजे यांनी मदत केली. त्याप्रसंगी मंगेश वडजे, बाळासाहेब मालसाणे, जे. एस. थविल आदी.
दिंडोरी : तालुक्यातील निगडोळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरदरावजी पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास सभामंडप व व्यासपीठ बांधकामासाठी मंगेश वडजे यांनी दीड लाख रुपयांचा धनादेश शाळेला सुपुर्द केला. रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी. एस. वडजे याचे चिरंजीव मंगेश वडजे यांनी निगडोळ येथील विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यांनी चेअरमन बबनराव मालसाणे व प्राचार्य जे. एस. थविल यांच्याकडे दीड लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.