शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने शेतकरी धास्तावला

By admin | Updated: March 1, 2016 23:20 IST

बेमोसमी पाऊस : वटार, भालूर परिसरात लग्नमंडपात पाणी, कांदा, द्राक्ष, गहू पिकांचे नुकसान

 मनमाडष्/वणी : गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि गतवर्षी गारांचा मारा यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या दुष्काळात पाण्याचे टॅँकर आणून वाचविलेले द्राक्षबाग आणि अन्य पिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. परिसरासह दिंडोरी, वणी, पिंपळगाव, भालूर येथे सोमवारी दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे मनमाड शहरातील नागरिकांची धांदल उडाली. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची पळापळ झाली. भालूर, एकवई, धनेर, नवसारीसह परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांनी गर्दी केली असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. परिसरातील भालूर, एकवई, धनेर, नवसारी गावांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन प्रचंड पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतांमध्ये गारांचा खच पडला होेता. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे कांदा, गहू, हरबरा याबरोबरच द्राक्ष व डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा निर्यात होणारा द्राक्षमाल गारपिटीमुळे खराब झाला आहे.अशा प्रकारची गारपीट होऊ नये म्हणून चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव, वडाळीभोई आदि परिसरातील शेतकरी धास्तावला आहे. अशाच प्रकारच्या गारपिटीमुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला होता. यंदाच्या दुष्काळात कशीबशी द्राक्ष वाचविली आहेत.यावर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून, या पावसामुळे कांद्याचे पीक शेतात आडवे झाले आहे. काही ठिकाणी काढणीस आलेल्या कांद्यावर गारपीट झाल्याने कांद्याच्या पातीची शेंडे खुडले गेल्यामुळे पीक संपूर्ण नष्ट होण्याची वेळ आली आहे. अचानक गारपिटीसह झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.लग्नमुहूर्त असल्याने अनेक ठिकाणी सुरू असलेले हळदी आदि कार्यक्रमात अचानक आलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मांडवात उघड्यावर लग्न लावण्यात येते. या पावसामुळे विवाहसोहळा असलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.ओझर : शहरासह परिसरात काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु आंबा, द्राक्षांसह अन्य पिकांसाठी मात्र हा पाऊस व ढगाळ हवामान नुकसानकारक असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळ हवामान निर्माण होऊन जोरदार वारे वाहत होते. अचानक झालेल्या वातावरणातील या बदलाने उकाड्याने हैराण नागरिकांना काहीकाळ दिलासा मिळाला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक काही भागात पावसाने तुफानी तडाखा दिला. ओझर,टाऊनशिपसह पिंपळगावलाही तुफान पाऊस झाला. द्राक्षबागांवर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकरी धास्तावला आहे. नाशिकशहरासह भगूर, नाशिकरोड, वडाळागाव, सातपूर आदि भागात पावसाने काही काळ जोरदार हजेरी लावली. गेल्या दोनदिवसांत राज्यातील काही भागात विशेषत: विदर्भातील वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा तडाखा बसल्याने गहू, हरभरा, संत्रा या पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात असा पाऊस झाल्यास द्राक्ष, कांदा आदि पिकांचे नुकसान होऊ शकते. (लोकमत चमू)