कुंभमेळ्यावर ग्यानदास यांचा बहिष्कार

By Admin | Updated: February 27, 2015 23:35 IST2015-02-27T23:35:31+5:302015-02-27T23:35:45+5:30

कुंभमेळ्यावर ग्यानदास यांचा बहिष्कार

Gyanadas boycott at Kumbh Mela | कुंभमेळ्यावर ग्यानदास यांचा बहिष्कार

कुंभमेळ्यावर ग्यानदास यांचा बहिष्कार

नाशिक : पर्यायी शाहीमार्ग साधू-महंतांनी स्वीकारल्यानंतरही त्याची पुर्नपाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याने आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास संतप्त झाले आहेत. त्यांनी या सर्व प्रकारास पोलीस आयुक्त हेच जबाबदार असल्याचा आरोप केला असून, त्यांना न हटविल्यास कुंभमेळ्यास येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पर्यायी शाहीमार्गाची पुर्नपाहणी करण्यास सांगितले होते. त्यानंतर महंत ग्यानदास यांनी शुक्रवारी आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. नाशिकचे पोलीस आयुक्त नवीन मार्गाबाबत नागरिक आणि साधू-महंतांची दिशाभूल करीत आहेत, त्यामुळे त्यांना तातडीने हटवा, अशी मागणी यापूर्वीच राज्य सरकारकडे आपण केली होती, ती अद्याप मान्य झालेली नाही, त्यामुळे आता नाशिकच्या कुंभमेळ्यास येणारच नसल्याचे त्यांनी सांगितले.
शाहीमार्गात काट्या मारुती चौक येथून बदल करून ही मिरवणूक काळाराम मंदिर ऐवजी गणेशवाडी येथून नेण्याचा प्रस्ताव महंत ग्यानदास यांनी मान्य केला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Gyanadas boycott at Kumbh Mela