माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी गुलाबराव भामरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 04:32 PM2020-07-26T16:32:36+5:302020-07-26T16:35:10+5:30

मराठा हायस्कूलमध्ये झालेल्यी कार्यकारिणी बैठकीत मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक यांची अध्यत्रपदी निवड करण्यात आली आहे. गुलाबराव भामरे हे मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सेवक संचालक असून त्यांच्या अध्यक्षपदी निवडीने संघटनेच्या साहेबराव कुटे व आर.डी. निकम यांचा गट बळकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Gulabrao Bhamre as the President of Nashik District Secondary and Higher Secondary Headmasters Association | माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी गुलाबराव भामरे 

माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी गुलाबराव भामरे 

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी गुलाबराव भामरे यांची निवडभामरे यांच्या निवडीने कुटे, निकम गटाला बळकटी

नाशिक :मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे यांची नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मराठा हायस्कूलमध्ये झालेल्यी कार्यकारिणी बैठकीत भामरे यांची निवड करण्यात आली असून, यावेळी संघटनेचे कार्याध्यक्षपदी साहेबराव कुटे आणि कार्यवाहपदी आर.डी.निकम यांची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक संघाचे मावळते अध्यक्ष के.के.आहिरे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागेवर गुलाबराव भामरे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संघाच्या नवीन कार्यकारिणीने शिक्षक, विद्यार्थी, शाळा व संस्था यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन यावेळी नीलिमा पवार यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला केले आहे. याप्रसंगी उच्च माध्यमिक संघाचे राज्य अध्यक्ष डॉ.संजय शिंदे, डॉ.नानासाहेब पाटील, मार्गदर्शक के. एल. चव्हाण, डी.यू.आहिरे तसेच मुख्याध्यापक संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
 

Web Title: Gulabrao Bhamre as the President of Nashik District Secondary and Higher Secondary Headmasters Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.