शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेबाबत मार्गदर्शन

By admin | Updated: October 22, 2016 01:06 IST

सिन्नर नगर परिषद निवडणूक : स्वतंत्र खात्यातून धनादेशाद्वारे निवडणूक खर्च

सिन्नर : नगर परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना शेड्यूल बॅँकेत स्वतंत्र खाते उघडून धनादेशाद्वारे दैनंदिन निवडणूक खर्च करावा लागेल, या महत्त्वपूर्ण सूचनेसह आचारसंहिता अंमलबजावणीबाबत निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई यांनी मार्गदर्शन केले. सिन्नर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून, सोमवारपासून (दि. २४) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीचे सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्यासह तहसीलदार मनोजकुमार खैरनार, सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, अभियंता नितीन परदेशी, सुनील शिंदे, रवींद्र देशमुख आदि व्यासपीठावर उपस्थित होते. सरदेसाई, खैरनार व दुर्वास यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी, छाननी, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, चिन्ह वाटप यांची माहिती दिली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालिकेत बॅँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार असून, नोंदणीकृत पक्षाचा एबी फॉर्म नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा करावा लागणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आॅनलाइन उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर भरावा लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व अनामत रक्कम पालिकेत जमा करावी लागणार आहे. नोंदणीकृत राजकीय पक्षाद्वारा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एका सूचकाची आवश्यकता आहे, तर नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाच सूचकांची आवश्यकता असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  नगरसेवक निवडणुकीसाठी दोन हजार रुपये अनामत असून, राखीव जागेसाठी एक हजार रुपये अनामत भरावी लागणार आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने त्यासाठी एक हजार रुपये अनामत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निकाल लागल्यानंतर ३० दिवसांच्या आत एकूण निवडणूक खर्च जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे.  निवडणुकीत प्रार्थनास्थळांचा वापर करता येणार नाही. खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवर पूर्व परवानगीशिवाय ध्वज, फलक, सूचना लावता येणार नाही. प्रचार फेरी किंवा निवडणुकीकरिता जास्तीत जास्त तीन वाहने वापरता येतील. प्रचार कार्यालयांच्या संख्येवर मर्यादा नसून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवता येईल. सभेसाठी प्रस्तावित जागा व वेळेची ४८ तास अगोदर अर्ज करून परवानगी घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना यावेळी करण्यात आल्या.  यावेळी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक विजय जाधव, बापू गोजरे, मल्लू पाबळे, हर्षद देशमुख, शैलेश नाईक, मेहमूद दारुवाला, शीतल कानडी, विनायक सांगळे, सुनील केकाण, भाऊसाहेब शिंदे, पंकज जाधव, नामदेव कोतवाल, राजाराम मुरकुटे, रवींद्र काकड, राहुल बलक, ईलियास खतीब, शरद शिंदे,  अनिल कर्पे, सविता कोठुरकर, काशीनाथ भालेराव, सोमनाथ पावसे, अनिल जाधव, शरद शिंदे, पिराजी पवार, किरण लोणारे, वामन उकाडे, किरण मुत्रक, कल्पना रेवगडे, राजेंद्र बलक, दीपक श्रीमाळी, रंगा सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)