मराठा हायस्कूलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:00 AM2018-02-10T00:00:30+5:302018-02-10T00:28:53+5:30

नाशिक : येथील अ‍ॅड. मधुरा क्षेमकल्याणी यांनी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ‘आत्मविश्वास व सभाधीटपणा कसा वाढवावा’ याविषयी मार्गदर्शन केले.

Guidance program in Maratha High School | मराठा हायस्कूलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम

मराठा हायस्कूलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम

Next

नाशिक : येथील अ‍ॅड. मधुरा क्षेमकल्याणी यांनी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ‘आत्मविश्वास व सभाधीटपणा कसा वाढवावा’ याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक अरु ण पिंगळे यांनी त्यांचे स्वागत केले. क्षेकल्याणी यांनी ओमकार व ध्यानधारणा याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्यात सकारात्मकता, निर्णय व जबाबदारी याविषयी जाणिवा निर्माण केल्या. व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो हे प्रात्यक्षिकांद्वारे पटवून दिले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग,भाषण याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन के. डी. दरेकर यांनी केले. कार्यक्र मास सोपान येवले, पर्यवेक्षक अरु ण पवार, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Guidance program in Maratha High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा