सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

By Admin | Updated: January 23, 2016 23:39 IST2016-01-23T23:37:33+5:302016-01-23T23:39:40+5:30

उपक्रम : शाळांमध्ये स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम

Greetings to Subhash Chandra Bose | सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

नाशिक : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमध्येदेखील नेताजींची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले. व्याख्याने, रक्तगट तपासणी शिबिर, चालता-बोलता प्रश्नमंजूषा, चित्रफीत प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विकास नेवाळे, डॉ. अमिता पिसोळकर, प्रा. वैभव गुंजाळ, विकास माकोणे, विद्या माकोणे, सम्राट माळवदकर, प्रा. संजय साळवे यांनी मार्गदर्शन केले..
भाजपा कार्यालय
भाजपा कार्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष बाळासाहेब सानप, सुरेश पाटील, प्रकाश दीक्षित, बापू शिनकर, पुष्पा शर्मा, प्रवीण पेशकार, आशीष नहार, देवदत्त जोशी, उखा चौधरी, रामभाऊ नानोरकर, वर्षा डांगरीकर, अजिंक्य साने, सतीश वावीकर, गिरीधर भामरे, स्वाती भामरे, राजेश आढाव, मिलिंद भूमकर, प्रकाश बोराडे, विजय कुलकर्णी, दीपक दिंडे, राजीव मोरे, संजय गायकवाड, विजय मोहिते प्रियंका कानडे आदिंसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
सुभाष सार्वजनिक वाचनालय
जुने नाशिक परिसरातील सुभाष सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी दत्ताजी शिंदे होते. प्रास्ताविक ग्रंथमित्र दत्ता पगार यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्याच्या
हस्ते वाचनालयातील बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात
आला. याप्रसंगी प्रभाकर खंदारे
यांनी वाचनालयास पाचशे
रुपयांची देणगी दिली. यावेळी रामदास सोनवणे, शंकरराव बर्वे, गोविंदराव जगझाप आदि उपस्थित होते.

Web Title: Greetings to Subhash Chandra Bose