शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

परप्रांतीय व्यापाऱ्यांचे आगमन झाल्याने द्राक्ष हंगाम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:10 PM

लखमापूर: जिल्ह्यातील काही भागात द्राक्ष काढणीस सुरुवात झाल्याने, तसेच परप्रांतीय व्यापारी वर्गाचे आगमन होऊ लागल्याने ग्रामीण मजुरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दरवर्षी परप्रांतीय व्यापारी फसवणूक करून पसार होण्याच्या घडत असल्याने, यंदा द्राक्ष उत्पादक व मजुरांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.

सध्या द्राक्ष पंढरीतील काही गावांमध्ये द्राक्ष काढणीला सुरुवात झाल्याने कोरोना काळात ७ ते ८ महिने घरी बसलेल्या मजूर वर्गाला आता काम मिळणार आहे. कोरोनाच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने दिंडोरी तालुक्यातील मजूर वर्ग हतबल झाला होता. हाताला काम नसल्याने कमविलेले सर्व पैसे संपले होते. त्यामुळे संसाराचा गाडा कसा ओढायचा, या काळजीने मजूर वर्ग त्रस्त झाला होता, परंतु आता काही ठिकाणी द्राक्षे काढणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे मजूर आपल्या ठरावीक व्यापारी वर्गाच्या भेटी घेऊन कामाला प्रारंभ करण्याची भूमिका घेत आहे. त्यांच्या कामाच्या पद्धती ठरलेल्या असतात. जे मजूर पॅकर ( द्राक्ष बॉक्स पॅकिंग करणारे मजूर) आहेत, त्यांना इतर मजुरांपेक्षा जास्त वेतन दिले जाते. त्यामुळे व्यापारी वर्गातून चांगल्या पॅकरची मागणी होत असते. कारण जेवढा पॅकर चांगला तेवढा माल लवकर पॅकिंग करून बाजारपेठेत लवकर पाठविण्यास मदत मिळते. त्यामुळे पॅकर होण्यासाठी प्रत्येक मजुरांची धडपड असते.दिंडोरी, निफाड, उगाव, पिंपळगाव बसवंत, खेडगाव, वणी, ओझरमिग ,मोहाडी, जानोरी, पिंपळणारे, वडनेरभैरव इ. ठिकाणी बनारस, युपी, एमपी, कोलकाता, गुजरात, दिल्ली, हरयाणा, झाशी इ. राज्यांतील द्राक्ष व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात. प्रत्येक व्यापारी वर्गाकडे साधारणपणे १५० ते २०० मजूर कामांसाठी लागतात. व्यापारी वर्ग स्थानिक मजुरांमधील लोकांना हाताशी धरून त्याला मुकादम बनवितात. त्यामुळे मजूर भरतीचे मुकादमच करीत असल्याने व्यापारी वर्गाला मजूर टंचाई जाणवत नाही.साधारणपणे तीन ते चार महिन्यांचा हा द्राक्ष काढणीचा हंगाम असतो. त्यामुळे मजूर वर्गाला काम मिळत असते. व्यापारी वर्ग मजूर वर्गाच्या कामांचे वेतन आठवड्याला अदा करीत असल्यामुळे मजूर वर्ग खूश असतो.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती