शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी अध्यक्ष तयारीत; पदाधिकाऱ्यांचा सावध पवित्रा

By admin | Updated: May 17, 2016 00:10 IST

आयमा निवडणूक : उमेदवारी अर्ज विक्रीचा पहिला दिवस निरंकं

 सिडको : अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा (आयमा) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, आज अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज घेतला नसल्याचे आयमाच्या वतीने सांगण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आजी-माजी अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.एकीकडे मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी सत्ताधाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदाचा दिलेला शब्द पाळावा अन्यथा निवडणूक लढविणारच, असा पवित्रा तुषार चव्हाण गटाने घेतला आहे. तर सत्ताधारी मात्र असा शब्द दिला नसल्याचे सांगत आहे. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाकडून विद्यमान सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष वरुण तलवार, नीलिमा पाटील व पंडित ब्राह्मणकर यांची नावे पुढे आली आहेत. सत्ताधारी गटाकडील चार उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली असतानाच सत्ताधारी गटाकडून माजी अध्यक्ष सुरेश माळी व विद्यमान अध्यक्ष विवेक पाटील यांच्याही नावाची चर्चा होत असताना या निवडणुकीत माजी अध्यक्षांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विरोधी गटाकडून तुषार चव्हाण हेच एकमेव उमेदवार आहेत. आज अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी एकही अर्जाची विक्री झाली नसल्याचे आयमाच्या वतीने सांगण्यात आले. मागील निवडणुकीत अध्यक्षपदासाठीचे उमेदवार विवेक पाटील यांचे नाव दहा दिवस आधीच जाहीर करण्यात आले होते. यंदा मात्र सत्ताधारी गटाकडून सहा उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली आहे. परंतु यानंतरही अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करण्यात येत नसल्याने निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अध्यक्षपदासाठी विरोधी गटाकडून आयमाचे माजी उपाध्यक्ष तुषार चव्हाण हे एकमेव उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या सर्व घडमोडींमुळे आयमा निवडणुकीकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)