शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सायगावात ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 19:04 IST

येवला तालुक्याचा सतत अवर्षण प्रवण क्षेत्रातील उत्तरपूर्व भाग शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, यासाठी सायगाव ग्रामस्थांनी दि. ५रोजीयेथील रोकडोबा पारावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करत ठराव केला.

येवला : येवला तालुक्याचा सतत अवर्षण प्रवण क्षेत्रातील उत्तरपूर्व भाग शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, यासाठी सायगाव ग्रामस्थांनी दि. ५रोजीयेथील रोकडोबा पारावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करत ठराव केला. ठरावाच्या प्रती राज्य शासनाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला पाठविणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. योगिता भालेराव होत्या.येवला तालुक्याचा उत्तरपूर्व भाग सतत दुष्काळाच्या छायेत असतो. या भागातील शेतीला पर्यायी सिंचनाची सुविधा नसल्याने येथील शेती ही निसर्गाच्या लहरीवरच अवलंबुन आहे. अशा अत्यल्प पावसाने कधी खरीप तर कधी रब्बी हंगाम वाया जातो. चालु हंगामात आपुर्या पर्जन्यमानामुळे मका, बाजरी, कपाशी पिके करपली. उत्पादन खर्चही भागणार नाही,येवढे उत्पादन घटले. तरीहीराज्यात दुष्काळ जाहिर करतांना शासनाने येवला तालुका वगळला. सरकारच्या या भेदनितीचा सायगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेतुन खरपूस समाचार घेत जाहिर निषेध नोंदवला.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघाचे सल्लागार समतिीचे संचालक भागुनाथ उशीर म्हणाले की, येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग हा कायमच दुष्काळग्रस्त असून पन्नास टक्केंपेक्षा कमी पिक आणेवारी असणाº्या६४गावांचा समावेश गंभीर दुष्काळ म्हणून जाहिर करावी.मागील वर्षापासून आजतागायत उत्तरपूर्व भागातील१४गावांना ट्रँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. येथील शेती निसर्गाच्या स्वाधीन आहे. चालु खरिप हंगामातील पिके उध्वस्त झाली. उत्पादन खर्चही न भागल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तत्वत: कर्जमाफिच्या दृष्टचक्र ात सापडलेल्या शेतकº्यांना दोन वर्षापासून पिककर्जाचे वाटप नाही. पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चारा पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अशा भिषण परिस्थित शासनाने तात्काळ या भागातील गावांना दुष्काळ जाहिर करून न्याय द्यावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतमजूरांना गाव परिसरात रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते वसंतराव खैरनार यांनी केली.याप्रसंगी शरद भालेराव,शिवाजी भालेराव,अ‍ॅड. सुभाष भालेराव, उपसरपंच दिनेश खैरनार,संजय पेंढारे,गुलाबराव दारूंटे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी अ‍ॅड. आर.डी.खैरनार, विजय खैरनार, भागीनाथ उशीर,सुनिल देशमुख,गणपत खैरनार,गोरख भालेराव, बशीर शेख, रघुनाथ खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव, गणपत उशीर, कचरू गाडेकर, छगन उशीर, प्रविण भालेराव, भाऊसाहेब आहिरे, बंडु निघुट, प्रल्हाद दारूंटे, संजय देशमुख,बाबुराव पठारे, दिलीप ढाकणे, लहानु भालेराव, कारभारी देव्हडे, आंबादास उशीर, प्रविण खैरनार, बबन ढाकणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेचे प्रास्ताविक व आभार ग्रामसेवक बोडखे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ