गोखले एज्युकेशनचे पदवीदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:24 IST2019-02-11T00:23:34+5:302019-02-11T00:24:02+5:30
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ रविवारी (दि.१०) जल्लोषात पार पडला. पदवीदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह प्रमुख पाहुणे सागर अग्रवाल आदी उपस्थित होते.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या पदवीदान सोहळ्यात पदवी प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर जल्लोष करताना विद्यार्थिनी.
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ रविवारी (दि.१०) जल्लोषात पार पडला. पदवीदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह प्रमुख पाहुणे सागर अग्रवाल आदी उपस्थित होते.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक येथील एचपीटी आर्ट, आरवायके सायन्स महाविद्यालय, बीवायके (सिन्नर) कॉमर्स महाविद्यालय, एनबीटी विधी महाविद्यालय, नाशिकरोड येथील आरएनसी कला, जेडीबी वाणिज्य अॅण्ड एनएससी विज्ञान महाविद्यालय, ओझर येथील एचएएल विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, एम. एस. गोसावी वाणिज्य महाविद्यालय, डॉ. एम. एस. गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय अशा संस्थेच्या विविध आठ महाविद्यालयांतील प्रथम आलेल्या प्रत्येकी दहा अशा
एकूण ८० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पदवी मिळाल्याचा जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.