शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

करवाढीवरून महासभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:34 AM

गेल्यावर्षी करवाढ रद्द करण्याचे महासभेत तीन वेळा ठरवूनदेखील त्याची अंमलबजावणी आयुक्तकरीत नसल्याने त्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महापौरांनी बगल दिली.

नाशिक : गेल्यावर्षी करवाढ रद्द करण्याचे महासभेत तीन वेळा ठरवूनदेखील त्याची अंमलबजावणी आयुक्तकरीत नसल्याने त्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महापौरांनी बगल दिली. आणि कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शुक्रवारी (दि. २२) झालेल्या महासभेत विरोधकांनी जाब विचारून गोंधळ घातला. हेच निमित्त करून महापौर रंजना भानसी यांनी क्षणार्थात सर्व विषय मंजूर करून महासभा गुंडाळली. यानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. नगरसचिवांनीदेखील पलायन केल्याने विरोधकांनी त्यांच्या दालनात जाऊन त्यांची खुर्ची उलटी करून त्यावर निषेधाचा मजकूर चिटकवला.पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गेल्या बुधवारी (दि.२०) महासभा विरोधकांच्या आग्रहामुळेच महापौर भानसी यांनी तहकूब केली होती. त्यामुळे करवाढ रद्दच्या ठरावाची अंमलबजावणी आयुक्त का करीत नाहीत याचा जाब विचारण्यासाठी दिलेल्या लक्षवेधीवर शुक्रवारी (दि. २२) आयोजित महासभेत चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु सभागृहाचे कामकाज सुरू होताच महापौरांनी सर्व प्रथम श्रद्धांजलीच्या प्रस्तावाचे वाचन केले. त्यानंतर अभिनंदनाचे प्रस्तावदेखील पारीत झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी विषय पत्रिकेवरील नियमित विषय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी त्यांना रोखले. बोरस्ते यांनी लक्षवेधीबाबत विचारल्यानंतर महापौरांनी लक्षवेधी दाखल नसल्याचे सांगितल्याने सर्वच विरोधी पक्ष संतप्त झाले आणि पीठासनासमोर जमा झाले. करवाढ रद्दच्या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, असे त्यांनी म्हणून बघितले. परंतु, महापौरांनी ऐकले नाही त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली.महासभेच्या आधी नियमानुसार तीन दिवस अगोदर लक्षवेधी सादर करूनदेखील ती दाखल का करून घेतली नाही म्हणून नगरसचिवांना जाब विचारला दरम्यान महापौरांनी वाढता गोंधळ घेऊन तातडीने विषय पत्रिकेवरील विषय  क्रमांक ३२४ (फेरीवाला उपविधी ठरवणे) वगळता सर्व विषय तातडीने मंजूर करून सभेचे कामकाज संपवले आणि राष्टÑगीत सुरू केले.नगरसचिवांच्या विरोधात घोषणाबाजीसभागृहातून बाहेर पडताच विरोधकांनी नगरसचिव यांचे दालन गाठले. परंतु नगरसचिव गोपीनाथ आव्हाळे हे तेथे नव्हते. त्यामुळे त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पळपुट्या नगरसचिवांचा धिक्कार असो, नियमानुसार कामकाज न करणाऱ्या नगरसचिवांचा निषेध असो, करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा देत नगरसेवकांनी खुर्ची उलटी केली यावेळी अजय बोरस्ते, विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार, अपक्ष गटनेता गुरुमित बग्गा, राष्टÑवादीच्या सुषमा पगारे, सत्यभामा गाडेकर, किरण ताजणे, हर्षदा गायकर, पश्चिम प्रभाग समिती सभापती वैशाली भोसले, सीमा ताजणे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.महापालिकेच्या महासभेत विरोधकांची लक्षवेधी टाळण्यामागे राजकारण काहीच नव्हते. बुधवारी (दि.२०) महासभा तहकूब झाली ती तहकूब महासभा आज घेतली होती आणि तहकूब महासभेत कोणतीही लक्षवेधी घेता येत नाही. विरोधकांनी ती दाखल केली असली तरी सभा तहकूब असल्यानेच मी ती स्वीकारली नव्हती. सभागृहात विरोधकांनी प्रश्न विचारल्यानंतर मी हेच त्यांना सांगितले, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पीठासनासमोर गोंधळ घातला आणि पीठासनावर चढूनदेखील राजदंडाला हात लावला. हे बरोबर नाही. त्यामुळेच कामकाज तहकूब करावे लागले.  - रंजना भानसी, महापौर

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेना