नाशिक : शहरात संशयित कोरोना बधितांच्या चाचण्या आणखी वाढविण्याबरोबरच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाढविणे या सारख्या क्षमता वाढीच्या सूचना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत त्याच बरोबर महापालिकेच्या कोरोना विरोधातील लढ्याला शासनाचे बळ देणार असल्याचेही सांगितले आहे.शहरातील कोरोना बाबतच्या परिस्थितीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी(दि ९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपा कडून सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.यावेळी आदित्य ठाकरे यांनी मनपास विविध सूचना दिल्या. त्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाढविणे (क्षमता वाढविणे) कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात करणे त्यात नाशिक मनपाचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग चे कामकाज उत्तम असून ते २३ टक्के कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. परंतु मनपाने या तपासण्या वाढविल्या असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे, हे मान्य केले. रुग्णांची संख्या वाढत असताना बेडची संख्या वाढवली असून ती पुरेशी आहे. त्यामुळे रुग्णांना कुठल्याही अडचणी निर्माण होत नाही. कोरोनाबाबत डाटा मॅनेजमेंट, लाईन लिस्ट करणे,अँनालेस करणे, रिस्पॉन्स मेकॅनिझम करणे इत्यादी बाबींवर भर देण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी केल्या.तसेच नाशिक महानगरपालिकेस कोरोनावरील उपचारास आवश्यक त्या साधनसामुग्री म्हणजेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर,बाय पँप व्हेंटिलेटर, ॲम्बुलन्स इत्यादी साठी सर्वतोपरी शासन स्तरावर मदत करण्याचे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.
आदित्य ठाकरे: मनपाच्या कोरोना विरोधी लढ्याला शासनाचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:08 IST
शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि.९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
आदित्य ठाकरे: मनपाच्या कोरोना विरोधी लढ्याला शासनाचे बळ
ठळक मुद्देविविध उपकरणे, रुग्णवाहिका पुरवणार