शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

नाईक शिक्षण संस्थेत सत्तापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 2:05 AM

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाच्या क्रांतिवीर पॅनलने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का दिला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसह तालुका संचालकपदांच्या १९ पैकी १९ जागांवर क्रांतिवीर पॅनलने विजय मिळविला आहे. मात्र सरचिटणीस व सहचिटणीस ही दोन महत्वाची पदे प्रगती पॅनलला मिळाली आहेत.

ठळक मुद्देहेमंत धात्रक सरचिटणीस : विरोधकांनी गड घेतला पण सरचिटणीसपद निसटले

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाच्या क्रांतिवीर पॅनलने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का दिला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसह तालुका संचालकपदांच्या १९ पैकी १९ जागांवर क्रांतिवीर पॅनलने विजय मिळविला आहे. मात्र सरचिटणीस व सहचिटणीस ही दोन महत्वाची पदे प्रगती पॅनलला मिळाली आहेत. सरचिटणीसपदासाठी हेमंत धात्रक व अभिजित दिघोळे या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने टेंडर मते मोजण्यात आली. यामध्ये हेमंत धात्रक हे विजयी झाले. तसेच सहचिटणीसपदाची जागाही जिंकण्यात सत्ताधारी प्रगती पॅनलला यश आले आहे.नाशिकशिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत क्रांतिवीर पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार पंढरीनाथथोरे यांनी विजयी आघाडी घेतली असून, त्यांनी संस्थेत गेल्या २५ वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत असलेल्या कोंडाजी आव्हाड यांच्यापेक्षा मताधिक्य घेतल्याने हा सत्ताधारी पॅनलला मोठा धक्का मानला जात आहे. तर उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. पी. आर. गिते यांनी प्रभाकर धात्रक यांच्या विरोधात विजय आघाडी घेतली असून,प्रगती पॅनलचे सहचिटणीसपदाचे उमेदवार क्रांतिवीर संस्था निवडणुकीला रविवारी (दि.२१) सकाळी ८ वाजेदरम्यान गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीला मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येऊन गठ्ठे तयार करण्यात आले. शनिवारी ७९ टक्के मतदान झाले होते. मतदानास सभासदांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही निवडणूक सत्ताधाऱ्यांना धक्का देणारी वा चुरशीची ठरेल, असा कयास बांधला जात होता. रविवारी झालेल्या मतमोजणीमुळे या अंदाजाला पुष्टी मिळाली. मतदारांनी यंदा सत्ताधारी गटाला हुलकावणी देत जबर धक्का दिला आहे. दोन्हीही पॅनल्सच्या समर्थकांनी सकाळपासून लॉन्सबाहेर गर्दी केली होती. ही गर्दी सायंकाळी वाढतच गेली.समर्थकांनी केला एकच जल्लोषसरचिटणीस पदासाठी हेमंत धात्रक व अभिजित दिघोळे यांना समान मते मिळाल्याने टेंडर मतांची मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीमध्ये तीन टेंडर मते टाकण्यात आली होती.यापैकी दोन मते हेमंत धात्रक यांच्या पारड्यात पडली तर एक मत दिघोळे यांना मिळाल्याने हेमंत धात्रक यांना विजयी घोषित करण्यात आले. हेमंत धात्रक यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणElectionनिवडणूक