शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

वाहतूक कोंडीत गुदमरला श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:10 PM

राष्टÑीय महामार्गाच्या एका बाजूला दाट लोकवस्तीत वसलेल्या सिडकोचा वाहतूक कोंडीत श्वास गुदमरू लागला आहे. अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहनांची वाढती संख्या पाहता सिडकोत अपघातांची मालिका सुरूच आहे.

ठळक मुद्देअपघातांची मालिका । अरुंद रस्ते, अतिक्रमण कारणीभूत

सिडको : राष्टÑीय महामार्गाच्या एका बाजूला दाट लोकवस्तीत वसलेल्या सिडकोचा वाहतूक कोंडीत श्वास गुदमरू लागला आहे. अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहनांची वाढती संख्या पाहता सिडकोत अपघातांची मालिका सुरूच आहे. मुख्य चौकात होणारी वाहतुकीची कोंडी व भाजी मार्केट परिसरातील गर्दीचा विचार करता सिडकोत सुरक्षित रस्ता वाहतुकीच्या शिकवणी ऐवजी ठोस उपाययोजनांची गरज आहे.सिडको भागातील दत्तमंदिर चौक, दिव्य अ‍ॅडलॅब, त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर या प्रमुख रस्त्यांवरून होणारी वर्दळ, अवजड व हलक्या वाहनांमुळे या रस्त्यांवर कायमच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या या रस्त्यांचे रुंदीकरण भविष्यात होणे अशक्य असले तरी, रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उपाययोजना उपयोगी ठरू शकतात. त्रिमूर्ती चौकाजवळील पेठे शाळेच्या परिसरात मुख्य रस्त्यावरच भाजीबाजार भरत असून, याच रस्त्याने भरधाव वेगाने वाहने ये-जा करीत असतात. यामुळे शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. असाच प्रकार पवननगर व उत्तमनगर येथे सकाळी व सायंकाळी पहावयास मिळतो. शाळा व महाविद्यालयांमुळे हा रस्ता नेहमीच गजबजलेला असताना त्यातच रस्त्यावरील विक्रेते, रिक्षा, बसचा थांबा यामुळे पायी चालणेही मुश्किल होत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व त्यातून अपघात ही नित्याची बाब झाली आहे. पवननगर चौकात मुख्य रस्त्यालगत जिजामाता भाजी मार्केट असून मार्केटच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण तसेच भाजीबाजारालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. बाजारात येणारे ग्राहक हे त्यांची वाहने मार्केटच्या बाहेर उभी करीत असल्याने रस्त्याने येणाºया- जाणाºया वाहनधारकांना मार्ग काढणेदेखील कठीण होते.सिडकोला लागूनच असलेल्या गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉल या मुख्य रस्त्यालगत कर्मयोगीनगर चौक रस्त्याने सिटी सेंटरकडे जाणाºया भागातही कायम अपघात होत असून, याठिकाणी गतिरोधक तसेच सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे आहे. संभाजी चौक, जुने सिडको, अंबड येथील एक्लो पॉइंट या भागातही वाहतुकीच्या समस्या आहेत. औद्योगिक वसाहतीत जाणाºया अवजड वाहनांची संख्या पाहता, त्यामानाने रस्ते अपुरे पडत असल्याने वाहतुकीची कोंडी व पर्यायाने अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत.बोगदे वाहतूक कोंडीतराष्टÑीय महामार्गावरून वाहने उड्डाणपुलाचा वापर करून थेट मुंबई वा धुळ्याकडे निघून जात असले तरी, नाशिक शहरात प्रवेश करणाºया वाहनांना पुलाखालूनच मार्गक्रमण करावे लागते. त्यासाठी राजीवनगर, लेखानगर, इंदिरानगर या ठिकाणी वाहनांना उड्डाणपुलाखालून ये-जा करण्यासाठी बोगदे करण्यात आले आहेत. मात्र वाहनांची संख्या व बोगद्याचा आकार पाहता, या बोगद्यांच्या तोंडाशी कायमच वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यावर अनेक उपाययोजना केल्या गेल्या, परंतु कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही.अवजड वाहनांची डोकेदुखीसिडकोतूनच अंबड औद्योगिक वसाहतीत अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. शिवाय औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणारी बहुतांशी वाहने सिडकोतून मार्गक्रमण करीत असल्यामुळे त्याचा सिडकोतील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीवर ताण पडतो. याशिवाय महामार्गाला लागून असलेल्या समांतर रस्त्यांवर दुहेरी वाहतूक सुरू असल्यामुळेदेखील बºयात वेळी अपघाताला आमंत्रण मिळते. या रस्त्यावर पायी चालाणाऱ्यांसाठी कोणतीही सोय नसल्याने पादचाºयांना कसरत करावी लागते.रस्ता सुरक्षेला जेमतेम प्रतिसादअलीकडेच पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाला सिडको व परिसरात जेमतेम प्रतिसाद मिळाला. सुरक्षित रस्ता वाहतुकीबाबत जनजागृती करण्याऐवजी पोलिसांनी कारवाईवरच लक्ष केंद्रित केले. त्यामुळे अशा जनजागृतीचा कितपत लाभ होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस