चांडक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव

By Admin | Updated: September 8, 2016 00:29 IST2016-09-08T00:27:46+5:302016-09-08T00:29:12+5:30

चांडक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव

Golden Jubilee of Chandak Vidyalaya | चांडक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव

चांडक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव

 सिन्नर : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री चंद्रभागाबाई आणि अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी लोगो अनावरण, शोभायात्रेस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीपाद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर पंचवटी समूहाचे संचालक विशाल चांडक, मनीषा चांडक, शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, राजेंद्र देशपांडे, बापूसाहेब पंडित, माधवी पंडित, संजीवनीच्या मुख्याध्यापक सुनीता कोथळकर, सारडाचे प्राचार्य नरेंद्र ठाकरे, मुख्याध्यापक स्रेहल महाजन, पर्यवेक्षक अनिल पवार, माजी विद्यार्थिनी कल्याणी गुजराथी, आश्विनी रायजादे आदि उपस्थित होते.
प्रारंभी विशाल चांडक यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुवर्णमहोत्सवी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर लेजीम, घोष, झांज व रुद्र ढोल-ताशा आदि पथकाच्या तालावर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. दांडिया नृत्याचे नेतृत्व खुशी निकम हिने केले. तिला जागृती टिळे यांचे मार्गदर्शन लाभले. झांजपथकास भोसला मिलिटरी स्कूलचे क्रीडाशिक्षक अनिल दुसाने यांचे मार्गदर्शन लाभले. महाजन यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक पवार यांनी स्वागत केले. (वार्ताहर)

Web Title: Golden Jubilee of Chandak Vidyalaya